'No rest days' म्हणत विराट कोहलीनं IPL आधी शेअर केला VIDEO

 इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचे तीन फॉरमॅटमधील सामने संपले तरी विराट कोहलीला मात्र थोडीही उसंत मिळाली नाही.

Updated: Mar 31, 2021, 08:01 AM IST
'No rest days' म्हणत विराट कोहलीनं IPL आधी शेअर केला VIDEO title=

मुंबई: इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचे तीन फॉरमॅटमधील सामने संपले तरी विराट कोहलीला मात्र थोडीही उसंत मिळाली नाही. सलग तीन फॉरमॅटमध्ये खेळल्यानंतर आता IPLसाठी तयारी सुरू केली आहे. IPLसंपल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंड दौरा देखील असणार आहे. त्यामुळे विराट कोहलीचं संपूर्ण शेड्युल खूप व्यस्त आहे. 

विराट कोहलीने एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली व्यायाम करत असल्याचं दिसत आहे. कोहली कायमच आपल्या फिटनेसबाबत चर्चेत राहिला आहे. आरामाचे दिवस नाहीत असं कॅप्शन दिऊन विराट कोहलीनं व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला 7 दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. त्यानंतर विराट कोहली आपल्या RCB टीम सोबत सराव करू शकणार आहे. 9 एप्रिलपासून IPL सुरू होत आहे. तर अंतिम सामना 30 मे रोजी रंगणार आहे.

IPL संपलं तरी कोहलीला आराम नसणार आहे. याचं कारण म्हणजे लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तयारी करावी लागणार आहे. 18 ते 22 जून रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे.