IPL 2021: कोहलीच्या संघाला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाजच कोरोनाच्या विळख्यात

अक्षर पटेलनंतर RCB संघातील ओपनिंग फलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, कोहलीचं टेन्शन वाढलं

Updated: Apr 4, 2021, 10:35 AM IST
IPL 2021: कोहलीच्या संघाला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाजच कोरोनाच्या विळख्यात title=

मुंबई: IPLवरच कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. एकीकडे नुकताच दिल्ली कॅपिटल्समधील अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियममधील स्टाफचे 8 हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता CSK, DC पाठोपाठ विराट कोहलीच्य़ा संघालाही कोरोनाचा फटका बसला आहे. 

कर्णधार कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील दमदार ओपनिंग करणारा फलंदाज देवदत्त पडिक्कलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाच्या विळख्यात सापडल्य़ानं देवदत्त सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे RCBसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

RCB संघाचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे. देवदत्त पडिकक्कल कोरोना पॉझिटिव्हनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळणे अवघड असल्याचं सांगितलं जात आहे. देवदत्त पडिक्कल सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.

IPL 2021: 5 खेळाडू IPLची ट्रॉफी मिळवण्यासाठी मोलाचे, दिल्ली कॅपिटल्सकडून वाढल्या अपेक्षा

 कर्नाटक आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सलामीवीर पडिक्कल असल्यानं कोहलीचं टेन्शन वाढलं आहे. नुकताच त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या 7 सामन्यात 147 च्या सरासरीने 737 धावा केल्या आहेत.  

दुसरीकडे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. CSK मधील क्रिएटीव्ह टीममधील एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्समधील स्पिनर अक्षर पटेलला देखील कोरोनाची लागण झाली आहे. IPL 9 एप्रिलपासून सुरू होणार असून खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.