IPL 2021 RCB vs CSK: सिक्सवर सिक्स! रविंद्र जडेजाचा मैदानात जलवा; 25 बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक

रविंद्र जडेजानं पाच षटकार ठोकले आहेत. त्यातला एक षटकार तर नो बॉलवर देखील ठोकला आहे. 

Updated: Apr 25, 2021, 05:42 PM IST
IPL 2021 RCB vs CSK: सिक्सवर सिक्स! रविंद्र जडेजाचा मैदानात जलवा; 25 बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक title=

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू आहे. अत्यंत चुरशीची लढत असलेल्या या सामन्यावर सर्वांच्या नजरा आहेत. भारतीय संघाचा माजी विरुद्ध आजी कर्णधार एकमेकांसोबत मैदानात भिडत आहे. या सामन्यात मैदानात उतरताच रविंद्र जडेजाचा तुफानी जलवा पाहायला मिळाला आहे. 

रविंद्र जडेजानं पाच षटकार ठोकले आहेत. त्यातला एक षटकार तर नो बॉलवर देखील ठोकला आहे. त्याशिवाय एक चौकार आणि 2 धावा त्याने काढल्या आहेत. जडेजाने 25 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. रविंद्र जडेजाने 28 बॉलमध्ये नाबाद 62 धावा केल्या आहेत. तर चेन्नई सुपरकिंग्स संघाने 191 धावा केल्या आहेत. 

चेन्नई सुपरकिंग्स संघाने बंगळुरू संघाला 192 धावांचं लक्ष्य दिलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजानं कमालीची खेळी केल्यानं विराट कोहलीची काहीशी निराशा देखील झाली आहे. आता RCBचा कर्णधार विराट कोहली हे आव्हान कसं पेलणार आणि आता या कोहलीच्या संघाला चेन्नईला रोखण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.