IPL 2021 RCB vs KKR: विजयाच्या हॅट्रिकसाठी विराटसेना सज्ज, असा आहे प्लॅन

विराट कोहलीची टीम तिसऱ्यांदा जिंकली तर हॅट्रिक होणार आहे. मुंबई विरुद्धचा पहिला सामना 2 विकेट्सने तर हैदराबाद विरुद्धचा सामना 6 धावांनी संघ जिंकला. 

Updated: Apr 18, 2021, 12:50 PM IST
IPL 2021 RCB vs KKR: विजयाच्या हॅट्रिकसाठी विराटसेना सज्ज, असा आहे प्लॅन title=

मुंबई: आयपीएल 2021च्या चौदाव्या हंगामात आजपासून डबल सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांमधील पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना चेपॉक स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता होणार आहे. 

विराट कोहलीची टीम तिसऱ्यांदा जिंकली तर हॅट्रिक होणार आहे. मुंबई विरुद्धचा पहिला सामना 2 विकेट्सने तर हैदराबाद विरुद्धचा सामना 6 धावांनी संघ जिंकला. आज कोलकाताच्या संघाशी विराट कोहलीचा संघ भिडणार आहे. कोलकाता विरुद्ध सामना जिंकण्यासाठी कोहलीनं मास्टरप्लॅन तयार केला आहे. 

विराट कोहली- आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या तुफान फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संघाची IPLमधील सुरुवात दमदार झाली आहे आता ही ऊर्जा  कोहली शेवटपर्यंत कशी टिकवतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

हर्षल पटेल- सर्वात जास्त विकेट्स काढणारा हर्षल पटेल आजही कोलकाता संघासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे हर्षलकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये हर्षलच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. 

एबी डिविलियर्स- याचा खांद्यावर दोन सामन्यात जेवढी जबाबदारी होती त्यापेक्षा जास्त आज आहे. मुंबई विरुद्ध सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली होती. मात्र हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याला तंबुत परतावं लागलं. 

ग्लॅन मॅक्सवेल- 14.25 कोटी देऊन संघात समाविष्ट करून घेतलेल्या ग्लॅन मॅक्सवेलकडे आज सर्वांचं लक्ष असणार आहे. पोलार्डने मारलेल्या षटकाराचा आज मॅक्सवेल रेकॉर्ड तोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याने मागच्या सामन्यात अर्धशतकही झळकावलं होतं. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डॅन क्रिश्चियन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल