IPL 2021 RCB vs RR: कोहलीसेना विरुद्ध संजू सॅमसन; प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल

कोहली सेनेनं आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये विजयी हॅट्रिक केली आहे. आता हा विजयाचा दबदबा कायम ठेवता येणार की युवा कर्णधार संजू सॅमसन RCB ला टक्कर देऊन पुढे जाणार हे आज ठरणार

Updated: Apr 22, 2021, 12:10 PM IST
IPL 2021 RCB vs RR: कोहलीसेना विरुद्ध संजू सॅमसन; प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल title=

मुंबई: कोहली सेनेनं आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये विजयी हॅट्रिक केली आहे. आता हा विजयाचा दबदबा कायम ठेवता येणार की युवा कर्णधार संजू सॅमसन RCB ला टक्कर देऊन पुढे जाणार हे आज ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) असा सामना आज वानखेडे स्टेडिमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला 2 विकेट्सनं, तर हैदराबाद संघाला 6 धावांनी पराभूत केलं. कोलकाता विरुद्ध 38 धावांनी कोहलीच्या संघानं विजय मिळवला आहे. आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चौथा सामना होणार आहे. 

राजस्थान संघाने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये 2 वेळा पराभव आणि एकदा दिल्ली विरुद्ध विजय मिळवला आहे. पॉइंट टेबलवर विराट कोहलीचा संघ दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान संघ 7 व्या स्थानावर आहे. आज विराट कोहली विरुद्ध संजू सॅमसन यांचे संघ मैदानात भिडणार आहेत. 

वानखेडेवर होणाऱ्या RR vs RCB सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. मागच्या सामन्यात बंगळुरू संघातील युजवेंद्र चहलची कामगिरी पाहता त्याला रिप्लेस केलं जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर राजस्थान संघात बेन स्टोक्स आणि दुसऱ्या इंग्लिश खेळाडू देखील IPL खेळणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला संधी दिली जाईल असा कयास आहे. 

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहमान

बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल