2019 मध्येच RCB चं कर्णधारपद सोडणार होता विराट कोहली, खेळाडूकडून मोठा खुलासा

विराट कोहलीने अलीकडेच भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद या सीजननंतर सोडणार असल्याचे सांगितले आहे.

Updated: Oct 9, 2021, 02:21 PM IST
2019 मध्येच RCB चं कर्णधारपद सोडणार होता विराट कोहली, खेळाडूकडून मोठा खुलासा title=

मुंबई : विराट कोहलीने अलीकडेच भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद या सीजननंतर सोडण्याचे ठरवले आहे. त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणाही केली होती. मात्र, विराट कोहली म्हणाला की, तो शेवटच्या श्वासापर्यंत आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत राहील. आयपीएलमध्ये पुढील वर्षीच्या हंगामापूर्वी  मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत तो आता आरसीबीचा भाग असेल की, नव्या संघाचा भाग बनेल हे पाहावे लागेल.

कोहलीने सांगितले की, त्याने आरसीबीचे सहकारी आणि चांगला मित्र एबी डिव्हिलियर्सशी आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याबाबत बोलले होते. त्याने सांगितले की, त्याला शांततामय वातावरण हवे आहे आणि म्हणूनच त्याने आरसीबीच्या कर्णधारपदापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एका मीडिया मुलाखतीत विराट कोहली म्हणाला, मी 2019 मध्ये AB शी या निर्णयाबद्दल बोललो. आयपीएलमध्ये मला नेहमीच शांत वातावरणात राहायचे होते. आम्ही याबद्दल बोललो आणि मग मला वाटले की, यासाठी आणखी एक वर्ष देऊ. मग व्यवस्थापनात बदल झाला आणि 2020 मध्ये गोष्टी खूप चांगल्या घडू लागल्या. त्यामुळे मला खूप बरं वाटलं.

कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएल 2020 मध्ये प्लेऑफ गाठले. परंतु ते यापेक्षा पुढे जाऊ शकले नाही. त्याचबरोबर, संघाने आयपीएल 2021 मध्ये देखील चांगला खेळ दाखवला आहे. या वर्षी, आरसीबीने ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. अशाप्रकारे, आरसीबी सलग दुसऱ्या वर्षी प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. संघाला आशा आहे की यावेळी त्यांचा आयपीएल जिंकण्याची प्रतीक्षा संपेल.

डिव्हिलियर्सकडून कोहलीचे कौतुक

एबी डिव्हिलियर्सने कोहलीच्या कर्णधारपदाची प्रशंसा केली. तो म्हणाला, 'विराट कोहली एक अप्रतिम कर्णधार आहे. त्याच्या अंतर्गत खेळणे हा सन्मान आहे. मी त्याचा चाहता आहे कारण गेल्या काही वर्षांत त्याला भारतीय संघ आणि आयपीएलच्या बऱ्याच दबावाचा सामना करावा लागला आहे.

मला वाटते की, त्याता निर्णय योग्य आहे या वातावरणात तो मजा करू शकतो. हे अशा प्रकारे आहे की, भारतीय क्रिकेटपासून दूर असताना, आयपीएलमध्ये मित्रांसोबत टी -20 क्रिकेटमध्ये तो थोडी मजा करु शकतो आणि नंतर सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी पूर्ण दबावाने तो खेळू देखील शकतो.