9 वर्षात एकदाही IPLचं विजेतेपद न जिंकताच विराट कोहलीनं सोडली कॅप्टनशिप, खेळाडूला भावना अनावर म्हणाला...

केकेआरविरुद्धचा एलिमिनेटर सामना विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला.

Updated: Oct 12, 2021, 12:43 PM IST
9 वर्षात एकदाही IPLचं विजेतेपद न जिंकताच विराट कोहलीनं सोडली कॅप्टनशिप, खेळाडूला भावना अनावर म्हणाला... title=

मुंबई : आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात केकेआरकडून पराभव झाल्याने आरसीबीचे पहिले विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. संघाच्या पराभवामुळे आरसीबीचे चाहते दु: खी तर झालेच आहेत, त्यात विराट कोहली जवळपास 10 वर्षे संघाचा कर्णधार असून देखील तो संघाला चॅम्पियन बनवण्यात अपयशी ठरला. याचे देखील त्यांना दु:ख आहे.

केकेआरविरुद्धचा एलिमिनेटर सामना विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला. ज्यामुळे कोहलीची 9 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. तो त्याच्या नेतृत्वाखाली संघाला एकदाही चॅम्पियन बनवू शकला नाही.

आयपीएल 2021 चा दुसरा हंगाम सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने जाहीर केले होते की, या हंगामानंतर तो कर्णधारपद सोडणार आहे. तथापि, विराटने आश्वासन दिले होते की, भविष्यात त्याला आरसीबीशी जोडलेले राहायचे आहे, परंतु तो एक फलंदाज म्हणून संघासाठी काम करेल.

तेव्हापासून चाहते आणि सगळ्यांची अशी आशा होती की, यावेळी तरी विराट सर्वशक्तीनीशी RCBला चॅम्पियन ट्रॉफिच्या दिशेने घेऊन जाईल. ज्यामुळे त्याचा चॅम्पियन कर्णधार म्हणून निरोप देता येईल. परंतु केकेआरने हे होऊ दिले नाही.

विराट कोहली आरसीबीला चॅम्पियन बनवू शकला नाही

विराट कोहली त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीसाठी एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2013 मध्ये संघाची कमान सांभाळली. (विराटने 2011, 2012 मध्ये काही सामन्यांसाठी कर्णधारपद हाती घेतले होते). विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB ने या लीगमध्ये एकूण 140 सामने खेळले आहेत, ज्यात या संघाने 64 सामने जिंकले आणि 69 सामने गमावले.

एक कर्णधार म्हणून, तो आतापर्यंत या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार होता आणि सर्वाधिक सामने जिंकण्यातही यशस्वी झाला. याशिवाय, त्याने 140 सामन्यांसाठी या संघाचे कर्णधारपद भूषवले आणि फ्रँचायझीसाठी सर्वाधिक सामन्यांच्या कर्णधारपदाच्या बाबतीत तो दुसरा होता. तर महेंद्रसिंग धोनी हा पहिल्या स्थानावर आहे.

कर्णधारपद सोडण्याबाबत विधान

कर्णधार म्हणून शेवटचा आयपीएल खेळण्याबाबत विराट कोहली म्हणाला, 'मी आक्रमक क्रिकेट खेळता येईल अशी परंपरा निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला आहे. मी भारतीय संघात तसाच प्रयत्न केला. मी एवढेच सांगू शकतो की, मी माझे सर्वोत्तम दिले आहे. मी येथे माझे 120 टक्के दिले आणि यापुढे मी मैदानावर खेळाडू म्हणून फ्रँचायझीला योगदान देत राहीन."

पुढे विराट म्हणाला, "आता एक चांगली संधी आहे की, आता आम्ही पुढील तीन वर्षांसाठी संघाची पुनर्बांधणी करू शकतो. मी फक्त बंगळुरूसाठी खेळणार आहे. प्रामाणिकपणा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आयपीएलच्या शेवटच्या दिवसापर्यंत या फ्रँचायझीला समर्पित राहील."