IPL 2021: वॉशिंग्टन सुंदरनं स्टेडियमवरून ठेवलं कुत्र्याचं नाव; काय कारण

ऑस्ट्रेलियातीला गाबा स्टेडियम आणि कुत्र्याचं नाव गाबा ठेवण्यामागे काय आहे कनेक्शन

Updated: Apr 5, 2021, 11:59 AM IST
IPL 2021: वॉशिंग्टन सुंदरनं स्टेडियमवरून ठेवलं कुत्र्याचं नाव; काय कारण title=

मुंबई: IPL 2021 अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. याची तयारी जोरदार सुरू असतानाच आता वॉशिंग्टन सुंदर मात्र एका वेगळ्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. बऱ्याचदा त्याच्या कामगिरीमुळे चर्चा तर होतेच पण यावेळी मात्र त्याच्या मित्राची सोशल मीडियावर चर्चा आहे. कोण आहे हा खास मित्र आणि का होते चर्चा काय आहे कारण आज जाणून घेऊया.

वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या 4 पायाच्या मित्राचा म्हणजेच आपल्या खास कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसत असलेल्या कुत्र्याचं नाव हे स्टेडियमच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. या कुत्र्याच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्याचं हे नाव ठेवण्यामागे खास कारण देखील आहे. हे कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. 

या कुत्र्याचं नाव गाबा असं आहे. गाबा हे ऑस्ट्रेलियातील स्टेडियमचं नाव आहे. या नावावरून सुंदरनं आपल्या कुत्र्याचं नाव ठेवलं आहे.

आयपीएल 2021 मध्ये वॉशिंग्टन सुंदर हा विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या आरसीबी संघाकडून खेळणार आहे. वॉशिंग्टनने भारतासाठी कसोटीतून पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला. त्याच मैदानावर भारताने इतिहास रचला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात सुंदरने दिमाखदार कामगिरी केली. 

सुंदरच्या योगदानामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या सामना जिंकण्यात यश मिळालं. गेल्या 32 वर्षांपासून कोणताही संघ जे करू शकला नाही ते भारतीय संघानं करून दाखवलं. या ऐतिहासिक क्षणांची आठवण कायम राहावी यासाठी सुंदरनं आपल्या कुत्र्याचं नाव तिथल्या गाबा स्टेडियमवरून ठेवलं आहे. त्याने सोशल मीडियावरून याबाबत चाहत्यांना माहिती दिली.