IPL 2021MI vs RCB : रोहित शर्माबरोबर ओपिंग कोण करणार?

क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. याचं कारण म्हणजे IPLच्या चौदाव्या हंगामाला काही तासांत सुरुवात होणार आहे.

Updated: Apr 8, 2021, 09:31 AM IST
IPL 2021MI vs RCB : रोहित शर्माबरोबर ओपिंग कोण करणार?  title=

मुंबई: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. याचं कारण म्हणजे IPLच्या चौदाव्या हंगामाला काही तासांत सुरुवात होणार आहे. 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स म्हणजेच रोहित शर्माची टीम आणि विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आमने-सामने भिडणार आहेत. 

मुंबई इंडियन्स संघाकडून पहिल्याच सामन्यात ओपनिंगसाठी रोहित शर्मासोबत कोण मैदानात उतरेल हा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय असतो. मुंबई इंडियन्स संघाकडे दोन पर्याय आहेत इशान किशन किंवा ख्रिस यापैकी कोण रोहितसोबत उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दुसरं म्हणजे पियुष चावला की राहुल चहर कोणाला रोहित शर्मा प्लेइंग इलेवनसाठी संधी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

मुंबई इंडियन्स संघातील संभाव्य प्लेइंग इलेवन 

रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, नाथन कूल्टर नाइल 

मुंबई इंडिय़न्स संघाचे सामने आणि शेड्युल

9 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) संध्याकाळी 7.30 वाजता
13 एप्रिल- कोलकाता नाईटरायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (KKR vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
17 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संध्याकाळी 7.30 वाजता
20 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs DC) संध्याकाळी 7.30 वाजता
23 एप्रिल- पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
29 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR)- दुपारी 3.30 वाजता
1 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) संध्याकाळी 7.30 वाजता
4 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (SRH vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
8 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (RR vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
10 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईटरायडर्स (MI vs KKR)  संध्याकाळी 7.30 वाजता
13 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) दुपारी 3.30 वाजता
16 मे- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI)  संध्याकाळी 7.30 वाजता
20 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (RCB vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
23 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स  (MI vs DC)- दुपारी 3.30 वाजता