IPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?

एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!

Updated: Apr 1, 2022, 11:43 AM IST
IPL 2022  : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे? title=

मुंबई : लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई टीमला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. खूप छोट्या छोट्या चुका टीमला महागात पडल्या आणि डोळ्यादेखत लखनऊ जिंकताना चेन्नईला पाहावं लागलं. यावेळी त्यांना पराभव स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. 

जी चूक लखनऊ टीमने गुजरात विरुद्धच्या सामन्यात केली तेच पुन्हा चेन्नईच्या टीममधील एका खेळाडूनं लखनऊ विरुद्धच्या सामन्यात केलं. मोईन अलीने एका कॅच सोडला आणि त्यानंतर सामन्यामध्ये जे घडलं ते विलक्षण होतं. अख्खा सामनाच पालटला. 

लखनऊचे क्रिकेटपटू बॅटिंगसाठी मैदानात उतरले तेव्हा चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांचे कॅच सोडल्यानं जीवदान मिळालं. त्याचा फटका चेन्नईला बसला. अखेर पराभवाचा सामना करावा लागला.

क्विंटन डि कॉकचा कॅट जेव्हा मोईन अलीच्या हातून सुटला तेव्हा 30 स्कोअर होता. त्यानंतर त्याने 50 धावा केल्या. डि कॉकने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 61 धावा केल्या. 45 बॉलमध्ये त्याने 9 चौकार मारले. जेव्हा तो आऊट झाला तेव्हा लखनऊचा स्कोअर 139 धावांवर 3 आऊट असा होता. 

चेन्नईमध्ये मोईन अली नाही तर तुषार देशपांडेकडूनही कॅच सुटला. हा कॅच पकडणं कठीण होतं मात्र तरीही तो प्रयत्न फसला. तो कॅच यशस्वी ठरला असता तर के एल राहुल आऊट झाला असता. दुसऱ्या सामन्यात राहुलने 26 बॉलमध्ये 40 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 

चेन्नई टीमने 210 धावांचं लक्ष्य लखनऊसमोर ठेवलं मात्र संघाने हे लक्ष्य योग्य पद्धतीनं पूर्ण केलं आणि चेन्नई टीमला हादरवून टाकलं. लखनऊ  टीमची कामगिरी पाहता इतर संघातही काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.