RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.  

Updated: May 20, 2022, 11:27 PM IST
RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक title=

मुंबई :  राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रवीचंद्रन अश्विन हे दोघे राजस्थानच्या विजयाचे हिरो ठरले. (ipl 2022 rr vs csk rajastan royals win by 5 wickets and qualify to playoffs against to chennai super kings)

राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रवीचंद्रन अश्विन नाबाद 40 धावांची विजयी खेळी साकारली. याशिवाय कॅप्टन संजू सॅमसनने 15 रन्सचं योगदान दिलं. तर रियान पराग नाबाद 10 रन्स करुन परतला. 

चेन्नईकडून प्रशांत सोळंकीने 2 विकेट्स घेतल्या. तर मोईन अली, मिचेल सॅंटनर आमि सिमरजीत सिंह या तिघांनी प्रत्येकी एका फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. तर पराभवामुळे राजस्थानचं आव्हान सुपंष्टात आलं आहे. आता उर्वरित एका जागेसाठी दिल्ली आणि आरसीबीमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. 

चेन्नईची बॅटिंग

त्याआधी चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक 93 धावा केल्या. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने 26 रन्स काढल्या. तर डेव्हॉन कॉनवेने 16 धावांचं योगदान दिलं.  

राजस्थानकडून युजवेंद्र चहल आणि Obed McCoy या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन आश्विन आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांनी 1 विकेट घेतली.

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन  : संजू सॅमसन (कॅप्टन-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयसवाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय. 

चेन्नई सुपर किंग्स : महेद्रं धोनी (कर्णधार -विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, अंबाती रायुडू, एन जगदीशन, मिचेल सॅंटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, मतीशा पतिरणा आणि मुकेश चौधरी.