IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

सौरभ तळेकर | Updated: Dec 18, 2023, 07:02 PM IST
IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग? title=
IPL 2024 Auction Timing Date And Live

IPL 2024 Auction Live Streaming: सर्वांना उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव (IPL 2024 Auction) परदेशात होईल. मिनी-लिलावात एकूण 333 खेळाडूंवर लिलाव होणार आहे. तर 10 संघांमध्ये एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार अन् कोणाला घरचा रस्ता दाखवला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कधी सुरू होणार लिलाव? (IPL 2024 Auction Timming)

दुबईच्या वेळेनुसार (IPL 2024 Auction Timing Date) आयपीएलचा लिलाव हा सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल. आयपीएलचा लिलाव दुबईतील कोका कोला एरिना येथे होणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग? (IPL 2024 Auction Live Streaming)

स्टार स्पोर्ट्सकडे IPL 2024 लिलावाची अधिकृत प्रसारक मान्यता आहे. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, स्टार स्पोर्ट्स १ एचडी तमिळ, तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ एचडी तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स १ कन्नड यावर तुम्ही लिलाव पाहू शकता. जर तुम्ही कामात असाल आणि मोबाईलवर तुम्ही जिओ सिनेमावर (JioCinema) लिलाव पाहू शकता.

कोणाकडे किती रक्कम बाकी? (Purse Left Per Team)

  • CSK - 31.4 कोटी रुपये
  • DC - 28.95 कोटी रुपये
  • GT - 38.15 कोटी रुपये
  • KKR -  32.7 कोटी रुपये
  • LSG - 13.15 कोटी रुपये
  • MI -  17.75 कोटी रुपये
  • PJKS - २९.१ कोटी रुपये
  • RCB - 23.25 कोटी रुपये
  • RR - 14.5 कोटी रुपये
  • SRH -  34 कोटी रुपये

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सकडे 31.4 रुपये उपलब्ध असून 6 खेळाडूंचा स्लॉट आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे  28.95 कोटी रुपये शिल्लक असून 9 खेळाडू खरेदी करु शकतात. गुजरात टायटन्सकडे 38.15 कोटी रुपये असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करण्याची मुभा असणर आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे  32.7 कोटी रुपये शिल्लक असून त्यांना 12 खेळाडू निवडता येणार आहेत. मुंबई इंडियन्सकडे 17.75 कोटी रुपये बाकी असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करता येणार आहेत.