IPL 2024: धोनी की कोहली, सरस कोण? RCB vs CSK सान्यात खेळपट्टी कशी असणार? जाणून घ्या तपशील

IPL 2024 CSK vs RCB : उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीयलचा पहिला सामना धोनी विरुद्ध कोहली असणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 21, 2024, 12:52 PM IST
IPL 2024: धोनी की कोहली, सरस कोण? RCB vs CSK सान्यात खेळपट्टी कशी असणार? जाणून घ्या तपशील title=

IPL 2024 CSK vs RCB In Marathi : आयपीए 2024 मधील 17 वा हंगामातील पहिला सामना उद्या म्हणजेच 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे.  हा सामना शुक्रवारी चेन्नईतील के एमए चिदंबरम स्टेडियम धोनी विरुद्ध कोहली यांच्यात असणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. आयपीएलचा पहिलाच सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आयपीएलच्या 17 व्या हंगामात एकूण दहा संघ असणार आहेत. यामध्ये  यात दिल्ली, कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्स आणि सनराइजर्स हैदराबादचा समावेश असणार आहे. त्यातच उद्यापासून सुरु होणाऱ्या आयापीएलचा सामना  गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरदरम्यान सामना रंगणार आहेत. एमएस धोनीता ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याचे बोललं जातयं. त्यामुळे धोनीला विजय गिफ्ट देण्यासाठी चेन्नईचा संघ सज्ज झालाय. तर दुसरीकडे 16 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सचा प्रयत्न असणार आहे. 

अंदाजे अशी असेल खेळपट्टी

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गेल्या आयपीएल हंगामातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची होती. येथे जो संघ नाणेफेक जिंकतो तो प्रथम गोलंदाजी करतो. प्रथम गोलंदाजी करून संघ प्रतिस्पर्ध्यांना किमान धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय त्यांना किती धावा करायच्या आहेत याचीही स्पष्टता मिळते. या मैदानावर आयपीएलच्या इतिहासात असे केवळ 4 वेळा घडले आहे जेव्हा 200 हून अधिक धावा झाल्या आहेत. या मैदानावर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. तसेच या खेळपट्टीवर चेंडूचा स्पीड कमी होतो आणि अडकतो, ज्यामुळे फिरकीपटूंना याचा चांगलाच फायदा होतो. फलंदाजांना येथे अत्यंत सावधपणे फलंदाजी करावी लागते. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्सचा स्क्वॉड : एम.एस.धोनी (कॅप्टन), अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिश तीक्ष्णा, महिषा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजित सिंग, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, रचिन रवींद्र, डेरेल मिशेल, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान आणि अरावेसी अवनीश

आरसीबीचा स्क्वॉड : फाफडु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान, रजत  पाटिलदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयथ प्रभुदेसाई, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॅमरोर, कर्ण शर्मा, मनोज भांडगे, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा , राजन कुमार, विजयकुमार, कॅमेरुन ग्रीन आणि मयंक डागर