भर मैदानात हिटमॅनला किस करण्याचा प्रयत्न, रोहित शर्मा लाजला... Video व्हायरल

IPL 2024 RR vs MI : आयपीएलमध्ये आज 38 वा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ सवाई मानसिंह स्टेडिअमवर जोरदार सराव करतायत. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 22, 2024, 03:23 PM IST
भर मैदानात हिटमॅनला किस करण्याचा प्रयत्न, रोहित शर्मा लाजला... Video व्हायरल title=

IPL 2024, RR vs MI: मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (RR) आयपीएलमधला अडतीसवा सामना खेळवला जाणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर (Sawai Mansingh Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांनी सवाई मानसिंह स्टेडिअमवर जोरदार सराव केला. या दरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

भर मैदानात रोहितला किस करण्याचा प्रयत्न
मुंबई इंडियन्सचे खेळाडू सराव करत असताना राजस्थान रॉयल्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्ड (Shane Bond) रोहित शर्मा जवळ आला आणि त्याने रोहितला किस करण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्सने हा प्रसंग कॅमेरात कैद केला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सने या व्हिडिओला सुंदर कॅप्शन दिला आहे. 'काही क्षण अनमोल' असतात असं मुंबई व्यवस्थापनाने या व्हिडिओ म्हटलं आहे. या व्हिडिओत शेन बॉन्ड रोहित शर्माच्या मागून येऊन हळूच रोहितच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न करतो. 

रोहित झाला हैराण
शेन बॉन्डच्या अचानक कृत्याने रोहित शर्मा काही क्षण आश्चर्यचकीत होतो आणि थोडासा मागे जातो. शेन बॉन्डला पाहून रोहित शर्मा खुश होतो आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. हे पाहून बाजूला उभ्या असलेल्या रविचंद्रन अश्विनच्या चेहऱ्यावर हसू येतं. रोहित आणि शेन बॉन्डच्या या व्हिडिओवर क्रिकेट चाहत्यांनी अनेक कमेंटस दिल्या आहे. शेन बॉन्ड आयपीएलमध्ये 2015 ते 2023 दरम्यान मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच होता. रोहित शर्मा आणि शेन बॉन्डमध्ये चांगलं बॉण्डिंग आहे. शेन बॉन्ड बॉलिंग कोच असताना मुंबई इंडियन्सने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.

मुंबई - राजस्थान आमने सामने
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थन रॉयल्सचा संघ आमने सामने आहेत. होम ग्राऊंडवर सामना असल्याने राजस्थान रॉयल्सचं पारडं जड आहे. त्यातच यंदाच्या हंगामात राजस्थानचा संघ जबरदस्त फॉर्मात आहेत. सहा सामने जिंकत राजस्थान आयपीएल पॉईंटटेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स खराब सुरुवातीनंतर ट्रॅकवर परतली आहे. मुंबईने सात पैकी तीन सामन्यात विजय मिळवलाय आणि आता पॉईंटटेबमलध्ये मुंबईने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. प्ले ऑफमध्ये जागा पटकावण्यासाठी मुंबईला पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.