RCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार?

Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव (RCB vs DC) केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुया

सौरभ तळेकर | Updated: May 12, 2024, 11:28 PM IST
RCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार? title=
Royal Challengers Bengaluru Playoffs Equation rcb vs dc

Royal Challengers Bengaluru Beat Delhi Capital : आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना (RCB vs DC) दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा पाडाव केला असून प्लेऑफच्या दिशेने बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru Playoffs Equation) आगेकुच केली आहे. आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव केला. सलग पाचव्या विजयानंतर आता आरसीबी पाईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावरून झेप घेत पाचव्या स्थानी पोहोचली आहे. आरसीबीच्या खात्यात आता 12 गुण झाले असून आता आरसीबीला आणखी एक सामना खेळायचा आहे. त्यामुळे आता विराट कोहलीची बंगळुरू प्लेऑफचा गड राखणार का? असा सवाल विचारला जात आहे. 

RCB vs DC सामन्याचा आढावा

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 187 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने 24 चेंडूत 32 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर रजत पाटीदारने 52 धावांची तर विल जॅकने 41 धावांची खेळी केली. तर दिल्लीसाठी शाई होपने 29 आणि जेक फ्रेझर-मॅकगर्कने 21 धावा केल्या. दुसरीकडे, आरसीबीच्या गोलंदाजांनी मिळून दमदार खेळ दाखवला. यश दयालने 3 तर लोकी फर्ग्युसनने 2 बळी घेतले. तर स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि कॅमेरून ग्रीन याने 1-1 विकेट घेतल्या.

आरसीबी प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार?

एकीकडे आरसीबीने प्लेऑफची रेस कायम ठेवली असून दुसरीकडे दिल्लीने जवळजवळ पॅकअप केलंय. आरसीबीने 13 सामने खेळले असून त्यांना अखेरचा सामना चेन्नईविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे आता आरसीबीने आज विजयाचे पेढे जरी वाटले असले तरी अखेरच्या सामन्यापूर्वी त्याचं तोंड कडू झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जर आरसीबी चेन्नईविरुद्ध चांगल्या मार्जिनने जिंकली तर आरसीबी प्लेऑफच्या लक्ष्मण रेषेवर पोहोचेल. मात्र, त्याआधी हैदराबाद आणि लखनऊला प्रत्येकी एका सामन्यात पराभव पत्करावा लागणार आहे. जर या तिन्ही पराक्रम घडले तर आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं. 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कॅप्टन), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.