10 संघ, 17 दिवस आणि 21 सामने! कुठे आणि कधी पाहता येणार...आयपीएलची सर्व माहिती एक क्लिकवर

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर चेन्नई आणि बंगलोरदरम्यान सलामीचा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 20, 2024, 07:10 PM IST
10 संघ, 17 दिवस आणि 21 सामने! कुठे आणि कधी पाहता येणार...आयपीएलची सर्व माहिती एक क्लिकवर title=

IPL 2024 : येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामचा थरार रंगणार आहे. 10 संघांमध्ये आयपीएलचं जेतेपद मिळवण्यासाठी चुरस रंगणार आहे. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (CSK vs RCB) सामना रंगणार आहे. एमएस धोनीचा ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे धोनीला विजयी गिफ्ट देण्यासाठी चेन्नईचा संघ सज्ज झालाय. तर 16 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सचा प्रयत्न असेल.

कधीपासून सुरु होणार आयपीएल?
आयपीएल 2024 ची सुरुवात येत्या शुक्रवार म्हणजे 22 मार्चपासून होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर झालं असून यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतली सर्व दहा संघ प्रत्येकी चार सामने खेळणार आहे. पहिला टप्पा 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंतचा आहे. 

किती संघांचा समावेश?
आयपीएल 2024 मध्ये एकूण दहा संघ (IPL 2024 Complete Squads) खेळणार आहेत. यात दिल्ली, कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्स आणि सनराइजर्स हैदराबादचा समावेश आहे 

आयपीएलचे सामने कुठे पाहाता येणार?
आयपीएलच्या सामन्यांचं (IPL 2024 When and how to watch) लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर दिसणार आहे. 

किती वाजता सुरु होणार सामने
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता तर दुपारचे सामने दुपारी 4 वाजता खेळवले जाणार आहेत. सामन्याच्या अर्धा तास आधी टॉस उडवला जाईल. 

IPL 2024 वेळापत्रक
22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 8 वा.पासून, चेन्नई
23 मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा. पासून, मोहाली
23 मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री 8 वा. पासून, कोलकाता
24 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी 3.30 वा.पासून, जयपूर
24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा.पासून, चेन्नई
27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, हैदराबाद
28 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री 8 वा. पासून, जयपूर
29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
30 मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ
31 मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वा. पासून, अहमदाबाद
31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम
1 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम
4 एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
5 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री 8 वा. पासून, जयपूर
7 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा.पासून, मुंबई
7 एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा. पासून, लखनऊ