क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप? RCB मध्ये चाललंय तरी काय? स्टार खेळाडूच्या Insta स्टोरीने खळबळ

IPL Auction 2024 Fans Puzzled After Cryptic Heartbroken Instagram Story: ही पोस्ट पाहून अनेकांनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. काहींनी थेट आरसीबीशी या स्टोरीचा संबंध लावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 23, 2023, 01:31 PM IST
क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप? RCB मध्ये चाललंय तरी काय? स्टार खेळाडूच्या Insta स्टोरीने खळबळ title=
या स्टोरीचे स्क्रीनशॉट झाले व्हायरल

IPL Auction 2024 Fans Puzzled After Cryptic Heartbroken Instagram Story: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी केल्यानंतर सूर्यकुमार यादवची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. सूर्यकुमार यादवने तुटलेल्या हृदयाचा म्हणजेच ब्रोकन हार्ट इमोंजी पोस्ट करत सूचक प्रतिक्रियावर नोंदवली आहे. मात्र आता अशाच एखाद्या भूकंपाची चाहूल लागलीय की काय अशी चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये आहे. ही चर्चा होण्यामागील कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूचं इन्स्टाग्राम स्टेटस.

कोणाची काय स्टोरी?

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. मोहम्मद सिराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर सिराजने सोशल मीडियावरुन सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सिराजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 5 ब्रोकन हार्ट इमोंजी पोस्ट केले आहेत. ही स्टोरी पाहून अनेकांनी नको त्या शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

स्क्रीनशॉट व्हायरल

मोहम्मद सिराजने भारतासाठी शेवटची टी-20 सिरीज याच माहिन्याच्या सुरुवातीला खेळली होती. तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही खेळणार आहे. सेंच्युरिअनच्या मैदानावर 26 डिसेंबरपासून ही कसोटी सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीत्याने पोस्ट केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

वेगवेगळ्या चर्चांना उधाण

सिराजला बंगळुरुच्या संघाने रिटेन केलं आहे. आरसीबीने 19 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये लिलावामध्येही लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि अल्जारी जोसेफ यासारख्या खेळाडूंना विकत घेतलं आहे. सिराजच्या या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. अनेकांनी या स्क्रीनशॉटसंदर्भात वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. काहींनी याचा संबंध सिराज खेळत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाशीही जोडला आहे. कोणाचं काय म्हणणं आहे पाहूयात...

1)

2)

3)

4)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सहभागी होणार आहेत.