आयपीएलमध्ये या क्रिकेटरच्या बहिणीने मैदानात वेधलं सगळ्यांचंच लक्ष

इंटरनेटवर होताय मोठ्या प्रमाणात सर्च...

शैलेश मुसळे | Updated: Apr 30, 2018, 07:27 PM IST
आयपीएलमध्ये या क्रिकेटरच्या बहिणीने मैदानात वेधलं सगळ्यांचंच लक्ष title=

मुंबई : आयपीएलमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुंदर व्यक्तींवर नेहमी कॅमेरा जातो. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यात देखील एक असाच चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्य़ाची सोशल मीडियावर चर्चा आहे. आयपीएलची नवी मिस्ट्री गर्ल पाहण्यासाठी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च सुरु आहे. कोण आहे ही मिस्ट्री गर्ल... ही मिस्ट्री गर्ल एका क्रिकेटरची बहिण आहे. मॉडलिंग आणि अभिनय याच्या शिवाय हिचं क्रिकेटशी देखील कनेक्शन आहे. अनेक खेळाडूंसोबत तिचे फोटो शेअर होऊ लागल्याने तिची चर्चा होऊ लागली आहे.

मालती चहर असं या तरुणीचं नाव आहे. मालती चहर ही दीपक चहर आणि राहुल चहरची बहिण आहे. हे दोघेही आयपीएलमध्ये खेळत आहेत. मालतीचा फेवरेट क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आहे. मुंबईच्या विरुद्ध सामन्यात तिचे एक्सप्रेशन सांगत होते की, ती या मॅचबाबत किती उत्साही होती.  मालती तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती जिम करते. सोशल मीडियावर तिचा व्यायाम करतांनाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मालतीने लखनऊमधून बीटेक केलं आहे आणि ती आता मॉडलिंगमध्ये आपलं करिअर करत आहे.

 

Finally I met the Captain Cool... MS Dhoni.... and he is so damn cool...an awesome person... and a sweetheart.... @mahi7781 #msd @deepak_chahar9 #csk

A post shared by Malti Chahar (@maltichahar) on

मालती 2014 मध्ये मिस इंडिया नॉर्थ रिजन रनरअप ठरली. 2014 मध्येच तिला जाहिरातींसाठी ऑफर मिळू लागल्या. मालती लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या जीनियस सिनेमामध्ये ती काम करणार आहे. या सिनेमामध्ये ती एक रॉ एजेंटच्या भूमिकेत असेल.

 

#indian #tradition #bindi #saree #jhumka #curls #nature

A post shared by Malti Chahar (@maltichahar) on

 

#staypositive #staystrong #live #love #haveagoodday #maltichahar

A post shared by Malti Chahar (@maltichahar) on