RCB vs RR Qualifier 2 | राजस्थाने टॉस जिंकला, कॅप्टन संजू सॅमसनचा फिल्डिंगचा निर्णय

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Updated: May 27, 2022, 07:48 PM IST
RCB vs RR Qualifier 2 | राजस्थाने टॉस जिंकला, कॅप्टन संजू सॅमसनचा फिल्डिंगचा निर्णय title=

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन संजू सॅमसनने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. (ipl qualifier 2 rcb vs rr rajsthan royals win toss and elect to bowl against royal challengers banglore)

रजत-कार्तिकच्या कामगिरीवर लक्ष

एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा रजत पाटीदारने विजयी भूमिका बजावली होती. रजतने लखनऊ विरुद्ध शतक ठोकलं होतं. रजतच्या या शतकी खेळीमुळे आरसीबीला विजय मिळवता आला होता. तसेच दिनेश कार्तिकने नाबाद राहत चांगली साथ दिली होती. यामुळे आरसीबीला या दोघांकडून या निर्णायक सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार का?

साखळी फेरीच्या शेवटी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी असतात. राजस्थानला पहिल्या संधी गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता दुसरी संधी आहे. त्यामुळे राजस्थान या दुसऱ्या संधीत आरसीबीवर 'हल्ला बोल' करणार का, याकडे क्रिकेट
चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन  : संजू सॅमसन (कॅप्टन-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय.   

आरसीबीचे अंतिम 11 खेळाडू : फाफ डुप्लेसी (कर्णधार) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जॉश हेजलवुड.