Arjun Tendulkar: शुभमनला बसली कानशिलात; बाजूला असलेल्या अर्जुनला हसू आवरेना!

Arjun Tendulkar: व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशन गुजरातचा ओपनर शुभमन गिलला कानाखाली लगावताना दिसतोय. मात्र यावेळी बाजूला असेलल्या अर्जुनची रिएक्शन पाहण्यासारखी होती. 

Updated: Apr 27, 2023, 10:01 PM IST
Arjun Tendulkar: शुभमनला बसली कानशिलात; बाजूला असलेल्या अर्जुनला हसू आवरेना! title=

Arjun Tendulkar: अखेर यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) डेब्यू करण्यात आला. अर्जुनने (Arjun Tendulkar) आतापर्यंत मुंबईकडून 4 सामने खेळले असून त्याने 3 विकेट्स देखील काढल्यात. नुकतंच गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अनेकांचं लक्ष अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्याकडे होतं. दरम्यान सामनापूर्वीचा अर्जुन आणि शुभमन यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय. 

आयपीएलचा 35 वा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात मुंबईचा 55 रन्सने पराभव झाला. मात्र या सामन्याच्या पूर्वी झालेल्या प्रॅक्टिस सेशनचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशन गुजरातचा ओपनर शुभमन गिलला कानाखाली लगावताना दिसतोय. मात्र यावेळी बाजूला असेलल्या अर्जुनची रिएक्शन पाहण्यासारखी होती. 

अर्जुनची रिएक्शन होतेय व्हायरल

इशान आणि गिल यांची मैत्री प्रत्येकालाच माहिती आहे. यावेळी मस्करीत इशान गिलच्या हलकेच थोबाडीत मारतो. यावेळी अर्जुन तेंडुलकर बाजूने जोरजोरात हसताना दिसतोय. शुभमन गिलला पडणारे फटके पाहताच अर्जुन हसू रोखू शकला नाही. यावेळी अर्जुनचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. 

गुजरातविरूद्ध अर्जुनने पहिल्यांदा केली फलंदाजी

मंगळवारी गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अर्जुनने आयपीएलच्या त्याच्या करियरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी देखील केली. अर्जुनने यावेळी 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये त्याने एक उत्तुंग सिक्स लगावला. याशिवाय या सामन्यात अर्जुनने चांगली गोलंदाजी केली. त्याने 2 ओव्हर्स फेकत 1 विकेट देखील काढली. 

शुभमन गिलचा नवा अवतार

सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलचा वेगळा अवतार पहायला मिळतोय. यामध्ये गिलने खास सूट घातलेला दिसतोय. शिवाय त्याच्या डोळ्यांवर चष्मा आणि मिशी आहे. शुभमनचा हा अवतार एक ए़ड शूट साटी असल्याचं समजतंय. त्याच्या या एडमध्ये रोहित शर्मा आणि श्रेयर अय्यर देखील आहेत.