करियरच्या पहिल्या टेस्टमध्ये अय्यरचं शतक; 'या' खेळाडूंचीही आहेत डेब्यूमध्ये शतकं

देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिलं शतक झळकावण्याचा विशेष विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावावर आहे. 

Updated: Nov 26, 2021, 11:39 AM IST
करियरच्या पहिल्या टेस्टमध्ये अय्यरचं शतक; 'या' खेळाडूंचीही आहेत डेब्यूमध्ये शतकं title=

कानपूर : कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने आपली छाप सोडली आहे. अय्यर डेब्यू कसोटी सामना खेळत आहे, ज्यात त्याने पहिल्या डावात शतक झळकावलं. यासह श्रेयस अय्यर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 16वा भारतीय ठरला आहे.

देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिलं शतक झळकावण्याचा विशेष विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावावर आहे. 1993 मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध ही खास कामगिरी केली होती. त्या सामन्यात लाला अमरनाथ 118 रन्स केले होते.

1- लाला अमरनाथ - इंग्लंड (1993) - 118 रन्स

2- दीपक शोधन - पाकिस्तान (1952) - 110 रन्स

3- ए जी कृपाल सिंह - न्यूझीलंड (1955) - 100 रन्स

4- अब्बास अली बेग - इंग्लंड (1959) - 112 रन्स 

5- हनुमंत सिंह - इंग्लंड (1964) - 105 रन्स 

6- गुंडप्पा विश्वनाथ - ऑस्ट्रेलिया (1969) - 137 रन्स

7- सुरिंदर अमरनाथ - न्यूझीलंड (1976) - 124 रन्स 

8- मोहम्मद अझहरुद्दीन - इंग्लंड (1984) - 110 रन्स 

9- प्रवीण आमरे - दक्षिण आफ्रिका (1992) - 103 रन्स

10- सौरव गांगुली - इंग्लंड (1996) - 131 रन्स 

11- वीरेंद्र सहवाग - दक्षिण आफ्रिका (2001) - 105 रन्स 

12- सुरेश रैना - श्रीलंका (2010) - 120 रन्स

13- शिखर धवन - ऑस्ट्रेलिया (2013) - 187 रन्स 

14- रोहित शर्मा - वेस्टइंडीज (2013) - 177 रन्स 

15- पृथ्वी शॉ - वेस्टइंडीज (2018) - 134 रन्स 

अय्यरने पहिल्या कसोटीत ठोकलं शतक

श्रेयसने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता. विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यात तो टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सामील होणार आहे. 

श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यामुळे आता खराब फॉर्ममुळे टीम इंडियाबाहेर जाण्याच्या जवळ असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी श्रेयस अय्यरने या खेळीने धोका निर्माण केला आहे.