श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये राहुलनं बनवलं हे रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Aug 3, 2017, 06:48 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये राहुलनं बनवलं हे रेकॉर्ड  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ३४४/३ एवढा झाला आहे. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा नाबाद १२८ रन्सवर तर अजिंक्य रहाणे नाबाद १०३ रन्सवर खेळत आहेत.

ताप आल्यामुळे पहिल्या टेस्टला मुकलेल्या के.एल.राहुलनं चांगलं कमबॅक केलं आहे. ५७ रन्स बनवून के.एल.राहुल रनआऊट झाला. पण या हाफ सेंच्युरीमुळे राहुलनं नवं रेकॉर्ड बनवलं आहे. लागोपाठ सहा टेस्टमध्ये सहा पन्नास पेक्षा जास्त रन्स बनवणारा राहुल हा पहिला ओपनर बनला आहे. तर असं रेकॉर्ड करणारा तो तिसरा भारतीय आहे. याआधी गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविडनं हे रेकॉर्ड केलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये राहुलनं आत्तापर्यंत ४ शतकं आणि ८ अर्धशतकं झळकावली आहेत.