सिरीज होण्यापूर्वीच Kane Williamson पटकावली ट्रॉफी; पंड्या फक्त पहातच राहिला...

या फोटोशूट दरम्यान घडलेली ही घटना कॅमेरात कैद झालीये खरी, मात्र ती फार कमी लोकांनी पाहिली असेल. सोशल मीडियावर या गंमतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 

Updated: Nov 16, 2022, 05:39 PM IST
सिरीज होण्यापूर्वीच Kane Williamson पटकावली ट्रॉफी; पंड्या फक्त पहातच राहिला... title=

India Tour New Zealand 2022 : टी-20 वर्ल्ड कप 2022 (T20 world cup) नंतर टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या (New Zealand) दौऱ्यावर पोहोचली आहे. या ठिकाणी हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 टी-20 सामने तर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली 3 वनडे सामने खेळायचे आहेत. टी-20 सिरीजचा पहिला सामना 18 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. वेलिंगटनमध्ये हा सामना होणार असून या पूर्वी दोन्ही कर्णधारांनी फोटोशूट केलंय. ट्रॉफीसोबत औपचारिक फोटोशूट (Photo Shoot) करताना एक गंमत घडली. 

या फोटोशूट दरम्यान घडलेली ही घटना कॅमेरात कैद झालीये खरी, मात्र ती फार कमी लोकांनी पाहिली असेल. सोशल मीडियावर या गंमतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. तर झालं असं की, फोटो शूट करताना ट्रॉफीसोबत केन आणि हार्दिक पोझ देऊन उभे होत. तितक्यातच एक हवेचा झोका आणि हवेने ट्रॉफी पडत होती. मात्र यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनच्या तत्परतेमुळे ट्रॉफचं नुकसान झालं नाही. कारण केनने लगेच ही ट्रॉफी कॅच केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

ही घटना घडली तेव्हा भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या मात्र विलियम्सनच्या मागे राहिला. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतोय. 

अनुभवींना आराम युवांना संधी 

निवड समितीने न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अनुभवींना विश्रांती तर खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि आर आश्विनला विश्रांती दिलीय. तर संजू सॅमसन,  उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदरसारख्या युवा खेळाडूंना संधी दिलीय. 

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

दरम्यान टी 20 सीरिजनंतर 25, 27 आणि 30 नोव्हेंबरला एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.