पृथ्वी शॉ-सपना गिलच्या वादातील शब्द ना शब्द; जाणून घ्या नेमकं काय झालं होतं? पोलिसांना काय सापडलं?

Prithvi Shaw Sapna Gill Controversy: सपना गिल (Sapna Gill) प्रकरणात भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला (Indian Cricketer Prithvi Shaw) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोर्टात सपना गिलने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान हा वाद नेमका काय होता? कशावरुन झाला होता? हे समजून घ्या.  

शिवराज यादव | Updated: Jun 27, 2023, 01:31 PM IST
पृथ्वी शॉ-सपना गिलच्या वादातील शब्द ना शब्द; जाणून घ्या नेमकं काय झालं होतं? पोलिसांना काय सापडलं? title=

Prithvi Shaw Sapna Gill Case: सपना गिल (Sapna Gill) प्रकरणात भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला (Indian Cricketer Prithvi Shaw) मुंबई पोलिसांनी क्लीन चीट दिली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलने पृथ्वी शॉवर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. पण पोलिसांनी तपास केला असता, सपना गिलने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने अंधेरी न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर होत सपना गिलचे सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याची माहिती दिली. 

सपना गिलने पृथ्वी शॉवर अंधेरी परिसरातील पबमध्ये छेड काढल्याचा आरोप केला होता. सेल्फी काढण्यावरुन सुरु झालेला हा वाद कोर्टात पोहोचला असून पोलिसांनी क्लीन चीट दिली असल्याने कोर्टही आता पृथ्वी शॉला निर्दोष ठरवू शकतं. दरम्यान, हा संपूर्ण वाद काय आहे ते समजून घ्या.

फेब्रुवारीत झाला होता वाद - 

15 फेब्रुवारीच्या रात्री पृथ्वी शॉ आपल्या मित्रांसह पबमध्ये गेला होता. तिथे सपना गिलही आपल्या मित्रांसह पोहोचली होती. सपना आणि तिच्या मित्रांनी मद्यपान केलं असल्याने नशेत होते. यावेळी त्यांनी पृथ्वी शॉकडे सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. पृथ्वीनेही त्यांच्यासह फोटो काढले. पण जेव्हा त्यांनी एकापेक्षा जास्त फोटो काढण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र पृथ्वीने नकार दिला. मात्र यावरुन सपना आणि तिचा मित्र शोबित ठाकूर यांनी पृथ्वीशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

यानंतर पृथ्वी शॉने हॉटेलच्या मॅनेजरशी संवाद साधत तक्रार केली. त्यांनी सपना गिल आणि तिच्या मित्राला बाहेर जाण्यास सांगितलं. पण इथेच वाद संपलेला नव्हता. तर यानंतर खरा वाद सुरु होणार होता. पृथ्वी शॉ पबमधून बाहेर भेटल्यानंतर सपना गिल आणि तिच्या मित्राने त्याच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी पृथ्वीवर हल्ला केला आणि बेसबॉल बॅटने त्याच्या गाडीची काच फोडली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

 पृथ्वी शॉ-सपना गिल प्रकरणात मोठा ट्विस्ट, मुंबई पोलिसांचा कोर्टात गौप्यस्फोट, म्हणाले "विनयभंग, छेडछाड..."

 

पृथ्वीच्या मित्रांना त्याला दुसऱ्या कारमध्ये बसवलं आणि घरी नेलं होतं. पृथ्वीचे मित्र त्याला कारमधून घरी नेत असताना सपना गिलने आपल्या मित्रांसह कार आणि बाईकवरुन गाडीचा पाठलाग केला. कारमध्ये पृथ्वीसह त्याचा एकच मित्र होता. पुढे एका यु-टर्नवर त्यांनी कार थांबवली आणि प्रकरण मिटवण्यासाठी  50 हजारांची मागणी केली. यानंतर पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली आणि 8 जणांविरोधात तक्रार दाखल केली. 

20 फेब्रुवारीला सपनाला जामीन
 

पृथ्वीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सपना गिलच्या वकिलानेही क्रिकेटरने दारुच्या नशेत छेड काढल्याचा आरोप केला. दरम्यान, पोलिसांनी सपना गिलला अटक केली होती. 20 फेब्रुवारीला तिला जामीन देण्यात आला. यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या. यादरम्यान, सपना गिलने अनेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या. पण पोलिसांना कोणताही पुरावा न सापडल्याने त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. 

पोलीस तपासात काय आढळलं?

पोलिसांनी तपास करताना सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसंच साक्षीदारांचे जबाबही नोंदवले. यादरम्यान, सपना आणि तिचा मित्र नशेत होते व सेल्फीवरुन त्यांनी पृथ्वीशी वाद घातल्याचं समोर आलं.  

पोलिसांनी कोर्टात सांगितलं की, पबमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता सपना गिल आणि तिचा मित्र शोबित ठाकूर यांनी मद्यपान केलं होतं आणि डान्स करत करत होते. शोबित ठाकूरला मोबाइलमध्ये पृथ्वी शॉचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता. पण पृथ्वीने त्याला थांबवलं होतं. सर्व फुटेज पाहिलं असता पृथ्वी किंवा इतर कोणीही सपना गिलचा विनयभंग केल्याचं अजिबात दिसत नाही. 

ही घटना घडली तेव्हा पबमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्यातील कोणीही सपना गिलने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आल्याचं सांगितलेलं नाही अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यांनी एअर ट्राफिक कंट्रोलचंही सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. यानुसार सपना गिल हातात बेसबॉल बॅट घेऊन पृथ्वीच्या गाडीचा पाठलाग करत होता. तिने पृथ्वीच्या गाडीची काच फोडल्याचंही सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 

पोलिसांनी सीआयएसफच्या अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवले आहेत. त्यांनीही सपना गिल दावा करत आहे तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व आधारे पोलिसांनी सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं कोर्टात सांगितलं आहे.