कोहलीने लार्ड्सवर विजयासह या माजी ऑस्ट्रेलियच्या कर्णधाराला टाकलं मागे

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक नवा रेकॉर्ड

Updated: Aug 17, 2021, 07:46 PM IST
कोहलीने लार्ड्सवर विजयासह या माजी ऑस्ट्रेलियच्या कर्णधाराला टाकलं मागे title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकला. लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने शानदार खेळ दाखवत प्रथम 272 धावांचे लक्ष्य ठेवले आणि नंतर यजमानांना केवळ 120 धावांवर पराभूत केले आणि 151 धावांनी मोठा विजय नोंदवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह भारतीय कर्णधार विराट कोहलीने माजी इंग्लिश अनुभवी कर्णधाराला मागे टाकले.

भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी 6 बाद 298 वर दुसरा डाव घोषित केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ भारतीय गोलंदाजीसमोर असहाय्य दिसला आणि संपूर्ण संघ अवघ्या 120 धावांवर पराभूत झाला. 

भारताने 151 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने 391 धावा केल्या आणि 27 धावांची आघाडी घेतली.

विराटने अॅलन बॉर्डरला मागे सोडले

परदेशी भूमीवर कर्णधार म्हणून कसोटी जिंकण्याच्या बाबतीत विराटने आता अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. लॉर्ड्समधील विजयानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरचा विक्रम मोडला. परदेशी भूमीवर सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पाकिस्तानचा मिसबाह-उल-हक 26 क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्लाइव्ह लॉयड 23 विजयांसह आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावावर 23 विजय आहेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव वॉ आणि रिकी पाँटिंगची नावे येतात, ज्यांनी 19-19 सामने जिंकले. परदेशात 14 कसोटी सामने जिंकल्यानंतर आता भारतीय कर्णधार विराट कोहलीचाही यादीत पहिल्या 5 मध्ये समावेश झाला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार बॉर्डरने 13 सामने जिंकले होते तर वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार विवियन रिचर्ड्सने 12 विजय मिळवले होते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने परदेशात 11 कसोटी सामने जिंकले होते.