IPL 2022 : दिरानं पतीशी जे केलं ते पाहून नताशाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला...

कृणालनेच हार्दिकची विकेट काढली आणि यावेळी हार्दिकची पत्नी नताशाने दिलेली रिएक्शन कॅमेरामध्ये कैद झाली.

Updated: Mar 29, 2022, 11:14 AM IST
IPL 2022 : दिरानं पतीशी जे केलं ते पाहून नताशाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला... title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या लीगमध्ये केवळ दोन टीम नव्हे तर दोन भाऊ आमनेसामने भिडत असल्याचं चित्र चाहत्यांनी कालच्या सामन्यात पाहिलं. गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात हा सामना होता. आणि या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या विरूद्ध क्रुणाल पंड्या एकमेकांविरोधात मैदानात होते. अशातच कृणालनेच हार्दिकची विकेट काढली आणि यावेळी हार्दिकची पत्नी नताशाने दिलेली रिएक्शन कॅमेरामध्ये कैद झाली.

11व्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्या गोलदाजी करण्यासाठी आला. यावेळी कृणाल पंड्याच्या पहिल्या बॉलवर हार्दिकने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि बॉल हवेतच राहिला. हा बॉल फिल्डींगला उभ्या असलेल्या मनीष पांडेकडे गेला आणि त्याने हा सोपा कॅच टिपला. 

लहान भाऊ हार्दिक पांड्याला आऊट केल्यानंतर कृणाल पंड्याने हाताने तोंड लपवलं. त्याचवेळी स्टँडमध्ये बसलेल्या हार्दिकची पत्नी नताशाची रिएक्शनही पाहण्यासारखी होती. हार्दिकला बाद होताच कॅमेरामनने कॅमेरा थेट नताशाकडे वळवला. यावेळी पती हार्दिक पंड्याला त्याच्याच मोठ्या भावाने बाद केलंय यावर तिचा विश्वास बसत नव्हता.

दरम्यान हार्दिक पांड्या आऊट झाल्याने कृणाल उदास झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हार्दिक पंड्या 28 बॉलमध्ये 33 रन्स करून आऊट झाला. 

कृणाल पांड्याने तो आऊट झाल्याचा आनंद साजरा केला नाही. दोन सख्खे भाऊ मुंबई टीमधून एकत्र खेळायचे मात्र त्यांना मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये त्यांना रिटेन केलं नाही. त्यामुळे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात खेळताना या सामन्यात दिसले.