लक्षात ठेवा... Coronaशी लढण्यासाठी 'विराट' मंत्र

विराट म्हणतो.... 

Updated: Mar 14, 2020, 07:04 PM IST
लक्षात ठेवा... Coronaशी लढण्यासाठी 'विराट' मंत्र  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आपल्या दमदार खेळीने कायमच क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या क्रिकेटपटू विराट कोहली यालाही अखेर कोरोनाती भीती सतावू लागली आहे. सारं जग कोरोनाच्या सावटाखाली असताना आता दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहेत. Coronaची ही सर्व दहशत पाहता विराटने आता या व्हायरसशी लढण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला आहे. 

विराटने सोशल मीडियावर लिहिलेली ही पोस्ट पाहता त्याने संदेश दिला म्हणण्यापेक्षा जणू काही कोरोनाशी लढण्यासाठीचा एक मंत्रच दिला आहे. WHOकडूनही कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेत त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात आली आहेत. त्यातच विराटने एक पोस्ट करत त्यात लिहिलं आहे, 'चला... खंबीरपणे आणि धैर्याने  #COVID19 चा सामना करु'. सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय अवलंबात आणत कोरोनाशी लढण्याचा संदेश त्याने दिला. सर्वांनीच या परिस्थितीमध्ये काळजी घ्या, असंही त्याने सांगितलं. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य आणि केंद्र प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. गर्दी टाळता येण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून शुक्रवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमधील उर्वरित एकदिवसीय सामने रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला. १५ मार्च आणि १८ मार्च या दिवशी अनुक्रमे लखनऊ आणि ईडन गार्डन्स येथे हे सामने होणार होते. 

वाचा : 'माझ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेह घरातच पडलाय'  

एकदिवसीय सामने रद्द करण्यासोबतच बीसीसीआयकडून यंदाच्या वर्षीचा आयपीएलचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.