पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड

  दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 5, 2018, 03:11 PM IST
पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड  title=

केपटाऊन :  दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे. 

भुवनेश्वर कुमार याने सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवरच सलामीवीर डेन एल्गरला शून्यावर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने अॅडिन मार्करम याला ५ धावांवर बाद केले. त्याने ११ चेंडूत ४ चौकारासह पाच धावा केल्या. भुवनेश्वरने त्याला पायचीत केले. 

त्यानंतर पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर खतरनाक हाशिम आमला याला ३ धावांवर बाद केले. सध्या क्रिजवर कर्णधार ड्युप्लेसीस आणि ए बी डिव्हिलिअर्स खेळत आहे.  शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, डिव्हिलिअर्सने १७ चेंडूत २३ धावा काढल्या आहेत. त्याने भुवनेश्वरला एका षटकात चार चौकार लगावले आहे. 

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झालीये. आफ्रिकेने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

भारताकडून या सामन्यात गोलंदाज जसप्रीत बुमराहने पदार्पण केलेय. कोहलीने जसप्रीतला टोपी देत पदार्पणाबद्दल कौतुक केले.

असा आहे संघ 

भारत - शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार

द. आफ्रिका - डीन एल्गर, एडन मार्केम, हाशिम आमला, एबी डेविलियर्स, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, वर्नोन फिलांडर, केशव महाराज, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, कॅगिसो रबाडा