GT vs DC Live Score, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा, गुजरातवर 6 विकेटांनी सोपा विजय

आयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Gujarat Titans vs Delhi Capitals) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुभमन गिल आणि ऋषभ पंत या दोघं युवा कर्णधारांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. 

GT vs DC Live Score, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा, गुजरातवर 6 विकेटांनी सोपा विजय

Gujarat Titans vs Delhi Capitals Live Score in Marathi: अहदाबादच्या मैदानावर आज गुजरातसमोर, दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स ही 6 अंकांसोबत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचे प्रदर्शन या वर्षी एवढे खास नसल्यामुळे ते 4 अंकांसोबत 9 व्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात बघण्यायोग्य गोष्ट असणार की, दिल्लीचा संघ आज आपल्या मागील मॅचमध्ये तगड्या राजस्थान रॉयल्सला पराभूत करणाऱ्या गुजरात टायटन्ससमोर आव्हान उपस्थित करू शकणार का?

17 Apr 2024, 22:14 वाजता

दिल्ली कॅपिटल्सने, गुजरात टायटन्सला अहमदाबादमध्ये 6 विकेट्सने मात दिली आहे. दिल्लीकडून फ्रेजर मॅक्गर्कने 20 धावांची खेळी खेळून दिल्लीला सोपा विजयाकडे नेलं आहे. तर गोलंदाजीत गुजरातकडून वॉरियर ने 2 तर जॉन्सन आणि राशिदने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. या विजयाने दिल्ली कॅपिटल्सला 2 गूण मिळाले असून पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर कायम आहे.

17 Apr 2024, 22:05 वाजता

राशिद खानच्या 6 व्या ओव्हरमध्ये श होप हा 19 धावांवर आउट झाला आहे. चौथ्या विकेटनंतर दिल्लीकडून सुमित कुमार हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 21:55 वाजता

संदिप वॉरियरच्या पाचव्या ओव्हरमध्ये अभिषेक पोरेल हा 15 धावांवर बाद झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर ऋषभ पंत हा फलंदाजीसाठी मैदानावर आला आहे. 5 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्लीचा स्कोर 65-3 असा आहे

17 Apr 2024, 21:41 वाजता

तिसऱ्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला दुसरा झटका बसला आहे. पृथ्वी शॉ हा 7 धावा करून बाद झाला आहे.दुसऱ्या विकेटनंतर शे होप हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 21:36 वाजता

दुसऱ्या ओव्हरमध्ये स्पेस्नर जॉन्सनने फ्रेजर मॅक्गर्कला 20 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या विकेटनंतर अभिषेक पोरेल हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 21:15 वाजता

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी आज अहमदाबादमध्ये कहर माजवला आहे. गुजरात टायटन्सच्या फलंदाजीला 20 ओव्हरच्या आधीच फक्त 89 धावांवर गुंडाळलं आहे. गुजरातकडून फलंदाजीत खूप निराशाजनक प्रदर्शन राहिले आहे. फक्त राशिद खान याने 31 धावांची खेळी खेळली आहे. पण याउलट गुजरातच्या गोलंदाजांनी फार उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुकेश कुमारने 3, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 2, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट झटकल्या आहेत. तर आता दिल्लीच्या फलंदाजीसमोर 90 धावांचे सोप लक्ष दिले आहे.

तर बघण्यायोग्य गोष्ट असणार की, गुजरात टायटन्सची गोलंदाजी आज दिल्लीच्या फलंदाजीला या कमी धावांवर रोखू शकणार की नाही?

17 Apr 2024, 20:58 वाजता

15 व्या ओव्हरमध्ये खलील अहमदला आपली मोहित शर्माच्या रूपात आपली पहिली विकेट मिळाली आहे. तर 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर 78-8 असा आहे.

17 Apr 2024, 20:41 वाजता

अक्षर पटेलच्या 12 व्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा शेवटचा फलंदाज राहुल तेवतिया हा 10 धावा करून बाद झाला आहे. सातव्या विकेटनंतर मोहित शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे. 

17 Apr 2024, 20:37 वाजता

11 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 65-6 असा आहे. तेवतिया हा 10 धावांवर तर राशिद खाव न हा 15 धावांवर खेळत आहे.

17 Apr 2024, 20:28 वाजता

9 व्या ओव्हरमध्येच ट्रिस्टन स्ट्ब्सने इम्पॅक्ट प्लेयर शाहरूख खान याला शून्यावर बाद केलं आहे. सहाव्या विकेटनंतर गुजरातची स्थिती गंभीर झाली आहे. गुजरातकडून मैदानावर राशिद खान फलंदाजीसाठी आला आहे.