kkr in playoffs : मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, केकेआरची प्लेऑफमध्ये धडक

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

kkr in playoffs : मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, केकेआरची प्लेऑफमध्ये धडक

MI vs KKR Live Score : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) आज घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल. 

12 May 2024, 00:34 वाजता

मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करून कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये पोहोचणारी कोलकाता पहिली टीम आहे. 158 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर ईशान किशनने40 धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने 17 बॉलमध्ये 32 धावा केल्या. तर केकेआरकडून हर्षित राणा, वरूण चकवर्ती आणि आँद्रे रसलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

12 May 2024, 00:27 वाजता

मुंबईला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. तिलक वर्मा आणि नमन धीर मैदानात आहेत.

12 May 2024, 00:08 वाजता

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या 2 धावा करून बाद झाल्यानंतर आता मुंबई इंडियन्सला अखेरच्या 4 ओव्हरमध्ये 66 धावांची गरज आहे.

12 May 2024, 00:06 वाजता

सूर्यकुमार यादवला बाद करून आंद्रे रसेलने केकेआरला तिसरे यश मिळवून दिले. सूर्यकुमार यादव 14 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. मुंबईने 11 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 बाद 88 धावा केल्या आहेत. 

 

11 May 2024, 23:43 वाजता

मुंबईला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर इशान किशन सुनील नारायणचा शिकार झाला. इशानने 22 बॉलमध्ये 40 धावांची खेळी केली. रोहित शर्मा अजूनही मैदानावर आहे.

11 May 2024, 22:54 वाजता

पावसामुळे 16 - 16 ओव्हरच्या या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या. त्यात व्यंकटेश अय्यरने 42 धावांची आक्रमक खेळी केली. तर नितीश राणाने 33 धावा उभारल्या. त्यानंतर अखेरीस रिंकू सिंगने 20 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून बुमराह आणि पियुष चावलाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

11 May 2024, 22:30 वाजता

एलबीडब्ल्यूने वाचलेला नितीश राणा तिलक वर्माच्या थ्रो मधून वाचू शकला नाही. तो 33 धावा करत बाद झाला.

11 May 2024, 22:10 वाजता

कोलकाताला चौथा धक्का बसला आहे. व्यंकटेश अय्यर 42 धावा करून बाद झाला. 21 बॉलमध्ये त्याने 6 फोर आणि 2 सिक्स लगावले.

11 May 2024, 21:54 वाजता

16 ओव्हरच्या सामन्यात कोलकाताची सुरूवात निराशाजनक झाली. कॅप्टन श्रेयस अय्यर देखील स्वस्तात बाद झाला.

11 May 2024, 21:26 वाजता

कोलकाचा नाईट रायडर्स 2 ओव्हरमध्ये 2 धक्के बसले आहेत. सॉल्ट हा एक सिक्स मारुन तर नारायण शून्यावर बाद झाला आहे.