PBKS vs SRH : रोमांचक सामन्यात हैदराबादचा दणदणीत विजय, पंजाबवर फक्त 2 धावांनी विजय

IPL 2024, PBKS vs SRH Live score : सनरायझर्स आणि पंजाब या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामन्यांत दोन विजय नोंदवले आहेत आणि दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरेल.

PBKS vs SRH : रोमांचक सामन्यात हैदराबादचा दणदणीत विजय, पंजाबवर फक्त 2 धावांनी विजय

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live score : आयपीएल 2024 च्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्जचा आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 

 

9 Apr 2024, 23:15 वाजता

सनरायझर्स हैदराबादने, पंजाब किंग्सविरूद्ध अत्यंत जवळच्या सामन्यात 2 धावांनी विजय प्राप्त केला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने शशांक सिंग आणि आशुतोष शर्मासमोर 29 धावा डिफेन्ड केल्या आणि हैदराबादला पॉइंट्स टेबलमध्ये 2 गुण प्राप्त करून दिलेय.

9 Apr 2024, 22:49 वाजता

नीतीश रेड्डीने 16 व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या जितेश शर्माची विकेट घेतली आहे. जितेश हा 19 धावा बनवुन आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर पंजाबचा आणखी एक दमदार फलंदाज आशुतोष शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे. 

9 Apr 2024, 22:42 वाजता

15 ओव्हरनंतर पंजाबला 30 बॉलमध्ये 75 रन्स लागत आहे. जितेश शर्मा हा 11 वर खेळतोय तर इन फॉर्म शशांक सिंगने एक बाजू सांभाळून ठेवली आहे शशांक हा 18 वर खेळत आहे आणि पंजाबचा स्कोर 105-5 असा आहे.

9 Apr 2024, 22:39 वाजता

स्ट्रॅटेजिक टाइम आउटनंतर लगेचच जयदेव उनाडकटने 14 व्या ओव्हरमध्ये सेट दिसत असलेल्या सिकंदर रझा 28 च्या स्कोरवर कॅच आउट झाला आहे. 5 व्या विकेटनंतर जितेश शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे.

9 Apr 2024, 22:18 वाजता

नटराजनच्या 10 व्या ओव्हरमध्ये पंजाबला धोका बनत असणारा सॅम करन हा 29 धावांची ताबडतोब इनिंग खेळून बाद झाला आहे. 10 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर आहे 66-4

9 Apr 2024, 21:53 वाजता

भूवनेश्वर कुमारच्या पाचव्या ओव्हरमध्ये पंजाबला मोठा धक्का बसलाय, पंजाबचा कॅप्टन शिखर धवन हा भूवनेश्वरच्या बॉलिंगवर 14 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पंजाब किंग्स 20-3

9 Apr 2024, 21:45 वाजता

तिसऱ्या ओव्हरमध्ये भूवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंग हा केवळ 4 धावा करून बाद झाला आहे. पंजाबच्या दुसऱ्या विकेटनंतर सॅम करन हा फलंदाजीसाठी  मैदानात आला आहे.

9 Apr 2024, 21:38 वाजता

हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिंस याने पंजाबचा धाकड फलंदाज जॉनी बेयरस्टो याला शून्यावर क्लिन बोल्ड केलं आहे. पहिल्या विकेटनंतर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून प्रभसिमरन सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे.

9 Apr 2024, 21:16 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर सनरायझर्स हैदराबादने, पंजाब किंग्सला 183 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबाकडून फक्त एकमात्र फलंदाजाने अर्धशतक केलं आहे. आंध्र प्रदेशाचा युवा खेळाडू नीतीश कुमार रेड्डी याने 37 बॉलमध्ये 64 धावांची उपायकारक खेळी खेळून एसआरएचला या धावसंख्येपर्यंच पोहोचवलं आहे. पंजाबकडून गोलंदाजीत अर्शदीपने उत्कृष्ट प्रदर्शन करत 4 विकेट घेतल्या आहेत, तर करन आणि हर्षलने 2 विकेट घेतल्या आहेत आणि एक विकेट ही रबाडाच्या खात्यात गेली आहे.

तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आज हैदराबाद आपला तिसरा विजय नोंदवते की पंजाब?

9 Apr 2024, 21:04 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडाच्या ओव्हरमध्ये हैदराबदचा कॅप्टन पॅट कमिंस याला क्लिन बोल्ड केलं आहे. हैदराबादची स्थिती प्रत्येक विकेटनं आणखी वाईट होते आहे.