PBKS vs SRH : रोमांचक सामन्यात हैदराबादचा दणदणीत विजय, पंजाबवर फक्त 2 धावांनी विजय

IPL 2024, PBKS vs SRH Live score : सनरायझर्स आणि पंजाब या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामन्यांत दोन विजय नोंदवले आहेत आणि दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरेल.

PBKS vs SRH : रोमांचक सामन्यात हैदराबादचा दणदणीत विजय, पंजाबवर फक्त 2 धावांनी विजय

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live score : आयपीएल 2024 च्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्जचा आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 

 

9 Apr 2024, 20:56 वाजता

अर्शदीप सिंगने 17 व्या ओव्हरमध्ये परत एकदा एकाच ओव्हरमध्ये दोन सेट फलंदाजांची विकेट झटकून हैदराबादची स्थिती खराब केली आहे. अब्दूल समद आणि नीतीश रेड्डी या दोघांनी 17 व्या ओव्हरमध्ये आपली विकेट गमावली आहे.

9 Apr 2024, 20:41 वाजता

15 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर 133-5 असा आहे. नीतीश रेड्डी याने 32 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. हरप्रीत ब्रारच्या 15 व्या ओव्हरीत नीतीशने 22 धावा काढल्या आहेत.

9 Apr 2024, 20:37 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये हैदराबादचा धाकड फलंदाज हेनरिक क्लासेन हा अर्शदिपच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. क्लासेनच्या विकेटनंतर अब्दुल समद हा फलंदाजीसाठी आला आहे. 

9 Apr 2024, 20:37 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये हैदराबादचा धाकड फलंदाज हेनरिक क्लासेन हा अर्शदिपच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. क्लासेनच्या विकेटनंतर अब्दुल समद हा फलंदाजीसाठी आला आहे. 

9 Apr 2024, 20:19 वाजता

10 ओव्हर अखेरीस हैदराबादचा स्कोर 66-4 असा आहे. राहूल त्रिपाठी हा बाद पंजाबच्या हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर धडाकेबाज फलंदाज क्लासेन हा फलंदाजीसाठी आला आहे.

9 Apr 2024, 19:51 वाजता

5 व्या ओव्हरनंतर पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांची कंबर मोडली आहे. पाचव्या ओव्हरीत अभिषेक शर्मासुद्धा बाद झाला आहे. तर पाचव्या ओव्हरनंतर हैदराबादची स्थिती 39-3 अशी आहे.

9 Apr 2024, 19:48 वाजता

अर्शदिप सिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादने ट्रॅविस हेड आणि एढण मारक्रम या दोघं धाकड फलंदाजांची विकेट गमावली आहे. 

9 Apr 2024, 19:07 वाजता

PBKS VS SRH : पंजाबचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

PBKS प्लेइंग 11 -

शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (W), आशुतोष शर्मा, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

SRH प्लेइंग 11 -

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

9 Apr 2024, 18:57 वाजता

हेड टू हेड

पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांचा पाचवा सामना असणार आहे. आयपीएलमध्ये पीबीकेएस आणि एसआरएच यांच्यात आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पंजाबने 7 सामने जिंकले आणि हैदराबादने 14 सामने जिंकले. तर आतापर्यंत पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 211 धावांची मजल मारली आहे. तर त्याचवेळी पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 212 धावांची खेळी केली होती.