लोकेश राहुलकडून अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड तुटता तुटता राहिलं!

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला.

Updated: Aug 22, 2018, 08:55 PM IST
लोकेश राहुलकडून अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड तुटता तुटता राहिलं! title=

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला. ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची टीम ३१७ रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये विराटनं शतक आणि सीरिजमध्ये ४०० रन केले. हार्दिक पांड्यानं ५ विकेट घेतल्या आणि अर्धशतक केलं. जसप्रीत बुमराहनंही ५ विकेट घेतल्या. तर पहिली टेस्ट खेळणाऱ्या ऋषभ पंतनं पहिल्या इनिंगमध्ये ५ कॅच घेतले. भारतीय विकेट कीपरनं टेस्टमध्ये एवढे कॅच घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याचबरोबर लोकेश राहुलकडून अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड तुटता तुटता राहिलं आहे. लोकेश राहुलनं या टेस्ट मॅचमध्ये तब्बल ७ कॅच पकडले. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचं रेकॉर्ड (विकेट कीपर वगळता) अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. २०१५ साली श्रीलंकेविरुद्ध गेल टेस्ट मॅचमध्ये रहाणेनं ८ कॅच पकडले होते.

ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपल यांनी भारताविरुद्ध १९७४ साली पर्थमध्ये, भारताच्या यझुवेंद्र सिंग यांनी इंग्लंडविरुद्ध १९७७ साली बंगळुरूमध्ये, श्रीलंकेच्या हसन तिलकरत्नेनं कोलंबोमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९९२मध्ये, न्यूझीलंडच्या स्टिफन फ्लेमिंगनं झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये १९९७ साली आणि मॅथ्यू हेडननं श्रीलंकेविरुद्ध गेलमध्ये २००४ साली ७ कॅच घेतले होते.

दोन खेळाडूंनी घेतले ५ पेक्षा जास्त कॅच

एकाच मॅचमध्ये दोन खेळाडूंनी ५-५ कॅच घेतले आहेत. लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं हे रेकॉर्ड केलं आहे. याआधी सौरव गांगुली आणि एसएस दास यांनी बांगलादेशविरुद्ध २००० साली, पर्थमध्ये १९९२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध किरण मोरे आणि श्रीकांतनी आणि १९८९ मध्ये कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद अजहरुद्दीन आणि किरण मोरेंनी ५-५ कॅच पकडले होते.