‘या’ फोटोवरुनही मोहम्मद कैफवर पून्हा एकदा टीकेचा भडीमार

टीम इंडियाचा माजी बॅट्समन मोहम्मद कैफ याने काही दिवसांपूर्वी फेसबुसवर आपल्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर मोहम्मद कैफला सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलं होतं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 3, 2017, 04:34 PM IST
‘या’ फोटोवरुनही मोहम्मद कैफवर पून्हा एकदा टीकेचा भडीमार title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी बॅट्समन मोहम्मद कैफ याने काही दिवसांपूर्वी फेसबुसवर आपल्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर मोहम्मद कैफला सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलं होतं.

त्यानंतर आता पून्हा एकदा मोहम्मद कैफने सोशल मीडियात एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर पून्हा एकदा युझर्सने ट्रोल केलं आहे. सोशल मीडियात युझर्सने मोहम्मद कैफला ट्रोल करत प्रश्न विचारला आहे की, इस्लाम धर्मात याच्यावर बंदी तर नाहीये ना?

मोहम्मद कैफने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मोहम्मद कैफ आपल्या वडिलांसोबत घराबाहेर एका चहाच्या टपरीवर बसलेला आहे. त्या ठिकाणी कैफचे वडील चहा पित आहेत. हा फोटो कैफने शेअर करत म्हटलं आहे की, (“Early morning Matthi Chai with father #MagicalMornings”) “सकाळी-सकाळी वडिलांसोबत चहा.”

मोहम्मद कैफने शेअर केलेल्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आल्या. हा फोटो शेअर केल्यानंतर युझर्सने मोहम्मद कैफला ट्रोल करत कमेंट्सही केल्या. काही युझर्सने म्हटलं की, “चाय-मट्टी खाना तो इस्लाम में हराम नहीं है न!”

यापूर्वी मोहम्मद कैफ याने सूर्य नमस्कार केल्यामुळेही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. कैफने सूर्य नमस्कार करतानाचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता आणि त्यानंतर युझर्सने त्याच्यावर निशाना साधन ट्रोल केलं होतं. मुस्लिमांची प्रमुख धार्मिक संस्था दारु उलूमने कैफने केलेल्या सूर्य नमस्कारला इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. इतकेच नाही तर सूर्य नमस्कारवर दारुल उलूमने फतवाही काढला होता.