मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हसीन जहाँ इन्स्टाग्रामवर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चर्चेत राहते. हसीन जहाँ तिच्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सतत चर्चेचा विषय ठरतेय.

Updated: Aug 27, 2021, 07:04 PM IST
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत title=

मुंबई : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हसीन जहाँ इन्स्टाग्रामवर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चर्चेत राहते. हसीन जहाँ तिच्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सतत चर्चेचा विषय ठरतेय.

हसीन जहाँ एक व्यावसायिक मॉडेल आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर देखील होती. हसीन जहाँ तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. सोशल मीडियावर अनेक लोक हसीन जहाँला फॉलो करतात.

शमी आणि हसीन जहाँचा सुरू असलेला वाद

मोहम्मद शमीशी झालेल्या वादामुळे हसीन जहाँ बऱ्याच काळापासून आपल्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. अद्याप दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही.

शमीवर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचे लग्न 7 एप्रिल 2014 रोजी झाले होते. काही वर्षांनंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता, त्याचप्रमाणे हसीनने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत.

शमीवर बलात्काराचा आरोप

2018 मध्ये मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नी हसीन जहाँने हल्ला, बलात्कार, खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. शमीविरोधात कलम 498A (हुंडा छळ) आणि कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, तर त्याचा भाऊ हसीद अहमदवर कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोहम्मद शमीने 6 जून 2014 रोजी कोलकाताची मॉडेल हसीन जहाँशी लग्न केले. हसीन एक मॉडेल होती. मग ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर बनली. या दरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघांनीही एकमेकांच्या प्रेमात पडले. मग शमीने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. 17 जुलै 2015 रोजी शमी मुलीचा पिताही झाला.

हसीन जहाँने 2014 मध्ये शमीशी लग्न केल्यानंतर मॉडेलिंग सोडली. शमीच्या म्हणण्यानुसार, त्याला खूप नंतर कळले की हसीन जहाँचे हे दुसरे लग्न आहे. तिच्या पहिल्या पतीचे नाव सैफुद्दीन आहे. तो पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये स्टेशनरीचं दुकान चालवतो. जेव्हा मीडिया हसीन जहाँच्या आधीच्या पतीपर्यंत पोहोचला तेव्हा तो म्हणाला, "आमचे लग्न 2002 मध्ये झाले होते.

पहिल्या लग्नापासून तिला दोन मुली होत्या. 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफुद्दीनने सांगितले की त्याला दहावीपासून हसीन जहाँवर प्रेम होते. सैफुद्दीनने सांगितले की हसीनला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते, पण आमच्या घरातील स्त्रियांना नोकरी करण्याची परवानगी नव्हती. कदाचित हे हसीनला आवडत नव्हते. त्याने तिला घटस्फोट दिला.