आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे 5 बॅट्समन

आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 29, 2018, 05:10 PM IST
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे 5 बॅट्समन title=

मुंबई : आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

यंदाच्या सीजनमध्ये कोण सर्वाधिक सिक्स मारतो याकडे देखील सर्वाचं लक्ष आहे. सिक्सचा किंग गेलला मात्र यंदा कोणीच घ्यायला तयार नव्हतं. पण शेवटी पंजाबने त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणी सर्वाधिक सिक्स मारले पाहा.

सर्वाधिक सिक्स मारणारे खेळाडू

      खेळाडू                मॅच        इनिंग    रन        सिक्स

1.  क्रिस गेल             101       100     3626       265

2.  सुरेश रैना             161       157     4540      173     

3.  रोहित शर्मा           159       154     4207      172

4.  डेविड वॉर्नर           114       114     4014       160

5. विराट कोहली         149       141     4418       160