IND vs ENG : 'आप दोनो से जमाना है...', टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर ध्रुव जुरेलची भावूक पोस्ट!

IND vs ENG Test Series : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससोबत खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अशातच आता ध्रुवने इमोशनल पोस्ट (Dhruv jurel Emotional Post) करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Jan 14, 2024, 03:04 PM IST
IND vs ENG : 'आप दोनो से जमाना है...', टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर ध्रुव जुरेलची भावूक पोस्ट! title=
Dhruv jurel Emotional Post after selected for IND vs ENG Test Series

Dhruv jurel Emotional Post : टीम इंडियाला 25 जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची टी-20 सिरीज खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली. या सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ताफ्यात 22 वर्षीय तरूण खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससोबत खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याला टेस्ट टीममध्ये (IND vs ENG Test Series) संधी देण्यात आली आहे. अशातच आता ध्रुवने इमोशनल पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणतो Dhruv jurel ?

आपल्या मुलाला बॅट धरून फक्त क्रिकेट खेळता यावं, माझ्या आई आणि वडिलांनी केलेल्या सर्व त्यागासाठी मी धन्यवाद म्हणू इच्छितो. मी वचन देतो की, ही फक्त सुरुवात आहे. मम्मी, पापा, आप दोनो से जमाना है और अभी बोहोत नाम कामना है, असं म्हणत ध्रुव जुरेल याने पोस्ट केली आहे.

मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं. बाबांना याबद्दल सांगितलं तेव्हा ते खूप खुश झाले होते आणि विचारलं की, कोणत्या भारतीय संघात निवड झालीये. हा क्षण माझ्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी खूप भावनिक होता, असं ध्रुव जुरेल याने म्हटलं आहे.

राजस्थान रॉयल्स ते टीम इंडिया

22 वर्षीय ध्रुव जुरेलने 2023 इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी डेब्यू केला होता. राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये जुरेलला टीममध्ये सहभागी केलं होतं. यावेळी त्याला संघात फिनिशरची भूमिका देण्यात आली होती. अनेक सामन्यांमध्ये तो प्रभावशाली खेळाडू म्हणूनही खेळला. जुरेलने त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामात 172.73 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 152 रन्स केले होते. यावेळी नाबाद 38 रन्स ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. 

पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.