'हा' स्टार खेळाडू दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात

पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेसोबत अफेअर, इंटीमेट सीनचे फोटो व्हायरल, कोण आहे हा खेळाडू?

Updated: Oct 7, 2022, 09:36 PM IST
'हा' स्टार खेळाडू दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात title=

मुंबई : प्रत्येक क्रिकेटरची जशी स्ट्रगलींग स्टोरी वेगळी असते, तितकीच त्याची लव्हस्टोरी देखील आगळीच असते. अशाच एका स्टार क्रिकेटरची लव्ह स्टोरी समोर आली आहे. ही लव्हस्टोरी एकूण तुम्हाला धक्काच बसेल. दरम्यान हा स्टार खेळाडू कोण आहे? व त्याची लव्हस्टोरी काय आहे, हे जाणून घेऊयात.  

ज्या स्टार खेळाडूच्या लव्हस्टोरी बाबत आपण बोलत आहोत, हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू नॅथन लायन (Nathan lyon) आहे. नॅथन लायनने 24 जुलै 2022 रोजी त्याची मंगेतर एम्मा मॅककार्थीशी (Emma mccarthy) लग्न केले.लायनचे हे दुसरे लग्न होते. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत एम्मा मॅककार्थीशी लग्न केल्याची चाहत्यांना माहिती दिली होती. त्याच्या या लग्नाची खुप चर्चा झाली होती. 

नॅथन लायन (Nathan lyon) आणि एम्मा मॅकार्थीने (Emma mccarthy) गेल्या वर्षी एंगेजमेंट केली होती. दोघेही गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी याच वर्षी लग्न गाठ बांधली होती. 

किस करतानाचे फोटो व्हायरल
एम्मा मॅकार्थीच्या (Emma mccarthy) आधी, त्याचे पहिले लग्न मेलिसा वारिंगशी झाले होते. मेलिसा वारिंगसोबत त्याला 2 मुलीही आहेत. 2017 मध्ये, नॅथन लियॉन आणि एम्मा मॅककार्थीचा (Emma mccarthy) एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही कारच्या आत किस करताना दिसले होते. या फोटोनंतरच मेलिसा वारिंग हिला या दोघांच्या नात्याची माहिती मिळाली होती. यानंतर लायनसोबत मेलिसा वारिंगने तिचे नाते संपवले होते. 

दरम्यान नॅथन लियॉनने (Nathan lyon) ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 110 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 438 विकेट्स आहेत.आपल्या क्रिकेटमधील कामगिरीसह या अफेअरमुळेही तो खुप चर्चेत आला होता.