शमीऐवजी टीममध्ये संधी मिळालेला नवदीप सैनी कोण आहे?

यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे मोहम्मद शमी अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टला मुकणार आहे.

Updated: Jun 11, 2018, 09:29 PM IST
शमीऐवजी टीममध्ये संधी मिळालेला नवदीप सैनी कोण आहे? title=

मुंबई : यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे मोहम्मद शमी अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टला मुकणार आहे. मोहम्मद शमीऐवजी युवा फास्ट बॉलर नवदीप सैनीला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. रणजीमध्ये दिल्लीकडून खेळणारा नवदीप सैनी घरगुती क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात जलद बॉलरपैकी एक आहे. मागच्या दोन रणजी मोसमामध्ये सैनीनं चांगलं प्रदर्शन केलं आहे. सैनी भारतीय अ टीमच्या चार दिवसांच्या मॅचसाठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यालाही जाणार आहे. २५ वर्षांचा नवदीप सैनीनं आत्तापर्यंत ३१ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत.

यो-यो टेस्टमध्ये हार्दिक-करुण सर्वोत्तम

भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी यो-यो टेस्ट पास करण्यासाठी १६.१ मार्क मिळणं आवश्यक आहे. यामध्ये हार्दिक पांड्या आणि करुण नायर यांचं प्रदर्शन सर्वोत्तम आहे. या दोघांचे मार्क १८ पेक्षा जास्त आहेत.

संजू सॅमसनही अपयशी

विकेट कीपर बॅट्समन संजू सॅमसनदेखील यो-यो टेस्टमध्ये नापास झाला आहे. त्यामुळे इंग्लंडला जाणाऱ्या भारत अ टीममध्ये सॅमसन नसेल. सॅमसनऐवजी आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या इशान किशनला संधी देण्यात आली आहे.