तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती

Amitabh Bachchan World Cup : अमिताभ बच्चन यांना वर्ल्ड कप न पाहण्यास का करतायत नेटकरी विनंती, एकदा जाणून घ्या.

दिक्षा पाटील | Updated: Nov 16, 2023, 03:03 PM IST
तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती  title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan World Cup : ICC वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. काल 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये दमदार सामना झाला. यावेळी मॅच पाहण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवानी आणि रजनीकांत यांसोबत अनेक कलाकार पोहोचले होते. विराट कोहलीचं शतक आणि मोहम्मद शमीचं जबरदस्त गोलंदाजीनं भारताला हा सामना जिंकण्यास मदत केली हे म्हणायला हरकत नाही. त्या दोघांची खेळी ही सामन्यातील लक्ष वेधी गोष्ट ठरली आहे. आता भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला असून टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. पण आता त्यांनी हे करून चूक केली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. खरंतर त्यांची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना फायनल मॅच पाहू नका असा सल्ला दिला आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय कारण आहे. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की जेव्हा 'मी पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो.' या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. या पोस्टनंतर त्यांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका नेटकऱ्यानं तर अमिताभ बच्चन यांना थेट पनवती म्हटलं आहे. त्यावर आणखी लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊया. 

एक नेटकरी अमिताभ यांच्या या ट्वीटवर कमेंट करत म्हणाला की 'अमिताभ सर याचा अर्थ तुम्ही बोलतायत की तुम्ही पनवती आहात?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अभिषेक बच्चनला ऐश्वर्या रायला 19 नोव्हेंबर रोजी म्हणेल की अरे बंद कर टीव्ही बंद कर'. या ट्वीटमध्ये त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील मीम शेअर केलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'प्लीज सर मग तुम्ही फायनल चुकूनही पाहू नका.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'प्लेअर ऑफ द सीजन तुम्हालाच मिळेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कृपया फायनल मॅच चुकूनही पाहू नका.' तिसऱ्या नेटकऱ्यानं डोळ्यावर पट्टी बांधलेला एक फोटो शेअर करत अमिताभ यांना म्हणाला की 'सर तुम्ही रविवारी कृपया असेच रहा.'

हेही वाचा : 'मी देवाची खूप आभारी आहे की मला...', अनुष्कानं विराटसाठी शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, अमिताभ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन हा प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांच्यासोबत देखील अमिताभ हे स्क्रिन शेअर करणार आहेत. मात्र, अजून त्यांच्या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही.