संघ अडचणीत, कर्णधार शॉपिंगमध्ये व्यस्त! लग्नासाठी बाबर आझमने भारतातून खरेदी केली इतक्या लाखांची शेरवानी

World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लग्न करणार आहे. यासाटी त्याने जोरदार तयारी सुद्धा सुरु केल्याची माहिती मिळतेय. सध्या भारतात असलेल्या बाबर आझमने लाखो रुपयांची शेरवाणीसुद्धा विकत घेतली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 3, 2023, 08:58 PM IST
संघ अडचणीत, कर्णधार शॉपिंगमध्ये व्यस्त! लग्नासाठी बाबर आझमने भारतातून खरेदी केली इतक्या लाखांची शेरवानी title=

Babar Azam's Marriage: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) सध्या भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. पाकिस्तान संघाची यंदाच्या विश्वचषकात सुमार कामगिरी झाली असून सेमीफायनलमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. संघ अडचणीत असताना एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या भारतात लग्नाची शॉपिंग करण्यात व्यस्त आहे. 

‘One Cricket’ च्या रिपोर्टनुसार बाबर आझम वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लग्न करणार असून यासाठी भारतील प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीकडून (Sabyasachi) तब्बल 7 लाख रुपयांची शेरवानी (Sherwani) विकत घेतली आहे. वर्ल्ड कपनंतर म्हणजे या वर्षाच्या शेवटी बाबरचा विवाह सोहळा पार पडणार असल्याचं बोललं जातंय. स्पर्धेत मिळणाऱ्या ब्रेकमध्ये बाबर आझमने भारतात मनसोक्त शॉपिंग करतोय.

पाकिस्तान संघ अडचणीत
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ सध्या अडचणीत सापडलाय. पाकिस्तान संघाला सातपैकी केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आलाय. पॉईंटटेबलमध्येही पाकिस्तान सहाव्या क्रमांकवर घसरलाय. त्यातच अफगाणिस्ताच्या नेदरलँडवरील विजायमुळे पाकिस्तानची सेमीफायनलची वाट अधिक बिकट झालीय. आयसीसी विश्वचषकात पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तानने जिंकले. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानाच धुव्वा उडवला आणि तिथूनच पाकिस्तान संघाच्या घसरणीला सुरुवात झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सातव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत तिसरा विजय मिळवला. 

बाबर आझमच्या बॅटमधून रन्स आटले
पाकिस्तान संघाची सुमार कामगिरी होत असताना कर्णधार बाबर आझमही आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. बाबर आझमने यंदाच्या विश्वचषकात खेळलेल्या सात सामन्यांमध्ये केवळ 216 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बाबरने ज्या तीन सामन्यात अर्धशतक झळकावलंय, त्या तीनही सामन्यात पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला आहे. यंदाच्या विश्वचषकात बाबरची सर्वोत्तम धावसंख्या 74 आहे. 

पॉईंटटेबलमध्ये पाकिस्तानचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पण त्याचबरोबर नेट रन रेटही वाढवावा लागणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या चार संघांमध्ये जबरदस्त चुरस आहे.