World Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही

Pakistan Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला आहे. अफगाणी खेळाडूंनी 8 विकेट्सने सामना खिशात घातला. त्याचबरोबर आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Know the Pakistan Semifinal qualification scenario) जाण्याचं स्वप्न आता अंधुक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचं गणित कसं असेल पाहुया...

सौरभ तळेकर | Updated: Oct 23, 2023, 11:06 PM IST
World Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही title=
Pakistan Semifinal qualification scenario

Pakistan vs Afghanistan : इंग्लंडचा पराभव केल्याने आत्मविश्वासात खेळणाऱ्या अफगाणिस्ताने वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) मोठा उलटफेर केला. अफगाणिस्ताने तगड्या पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभवाची धुळ चारली. अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) आणि इब्राहिम झदरन (Ibrahim Zadran) यांनी दमदार सलामी देत बाबर आझमचं टेन्शन वाढलं. तर रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी अफगाणिस्तानला फिनिशिंग टच दिला. पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) सुमार गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानने मॅच खेचून काढली. पाकिस्तानच्या या पराभवामुळे आता पाकिस्तानला टाटा गुड बाय करण्याची वेळ आली आहे. कारण पाकिस्तान आता इथून सेमीफायनल गाठेल, याची शक्यता कमी झालीये. पाकिस्तानचा आगामी रस्ता कसेल असेल? पाहुया...

पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. मात्र, त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विजयाच्या गाडीला ब्रेक लावला. त्यानंतर अजूनही पाकिस्तानची गाडी विजयाच्या रुळावर आली नाही. पाकिस्तानच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे पाच सामन्यात फक्त 2 विजयाच्या 4 गुणांसह पाकिस्तानचा संघ अंकतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर इंग्लंड आणि पाकिस्तानचा पराभव करून अफगाणिस्तानचा संघ देखील 4 गुणांसह सहाव्या स्थानी विराजमान झालाय. सध्या पाकिस्तानचा रनरेट -0.400 असा आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचं आख्खं गणित बिघडलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पाकिस्तान संघाचं आगामी वेळापत्रक

पाकिस्तानचा आगामी सामना 27 ऑक्टोबरला खतरनाक फॉर्ममध्ये असणाऱ्या अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यामुळे बाबरने आत्ताच हत्यारं टाकली असतील, अशी चर्चा आहे. अफ्रिकेविरुद्धचा विजय पाकिस्तानला जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, बांगलादेशसोबत होणारा 31 ऑक्टोबरचा सामना पाकिस्तानसाठी संजिवनी ठरू शकेल. पाकिस्तानसमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते न्यूझीलंडचं. 4 नोव्हेंबरला होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. तर 11 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी उर्वरित 4 पैकी 3 सामने खडतर असतील हे मात्र नक्की...

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.