World cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद?

World cup 2023: पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 29, 2023, 01:46 PM IST
World cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद? title=

World cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार असून त्यासाठी आता इतर देशांच्या टीम दाखल होतायत. नुकतंच पाकिस्तानची टीम देखील भारतात आली आहे. यावेळी पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे. 

यावेळी पाकिस्तान टीमच्या खेळाडूंनीही भारताकडून करण्यात आलेल्या पाहुणचाराचा आनंद घेतला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह अनेक बड्या क्रिकेटपटूंच्या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नवा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

शत्रू राष्ट्रात वर्ल्डकप खेळण्यास गेली पाक टीम

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अशरफ यांनी एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी भारताला त्यांचा शत्रू राष्ट्र म्हटलंय. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीये. झाका अश्रफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'माझे ध्येय हे आहे की, जेव्हा आमचे क्रिकेटपटू शत्रू राष्ट्रात खेळायला जातात किंवा जिथे एखादी स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास उंचावला पाहिजे.'

झका अश्रफ म्हणाले, 'जेव्हाही आमचे क्रिकेटपटू शत्रू देशात खेळायला जातात तेव्हा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळायला हवा, जेणेकरून ते अधिक चांगली कामगिरी करू शकतील.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर टीका करत आहेत. 

हैदराबादमधील पार्क हयात हॉटेलमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमधील खेळाडूंचा मुक्काम आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतात पाहुणचाराचा आनंद घेतायत. यावेळी त्यांनी हैदराबादी बिर्याणी आणि कबाबचा आस्वाद घेतला. वर्ल्ड कप 2023 मध्ये, पाकिस्तानला हैदराबादमध्ये 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 14 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.