Video : "जेव्हा आम्ही हरतो तेव्हा मलाच..."; पाकिस्तानच्या प्रक्षिकाने उडवली संघाची खिल्ली

संघाच्या कामगिरीसोबतच पत्रकार परिषदेसाठी पाठवण्यात आल्याच्या निर्णयाने टेट नाराज होते

Updated: Oct 2, 2022, 11:29 AM IST
Video : "जेव्हा आम्ही हरतो तेव्हा मलाच..."; पाकिस्तानच्या प्रक्षिकाने उडवली संघाची खिल्ली title=

Eng vs Pak : इंग्लंडने (Eng vs pak) सहाव्या टी-20 सामन्यात पाकिस्तानवर आठ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवत मालिकेत 3-3 अशी बरोबरी साधली. या सामन्यात इंग्लंडचा (Eng vs pak) सलामीवीर फिल सॉल्टने (Phil Salt) 88 धावांची खेळी केली. या सामन्यात बाबर आझमनेही (babar azam) 87 धावा केल्या होत्या. पण सॉल्टच्या (Phil Salt) खेळीसमोर पाकिस्तानी (pakistan) कर्णधार बाबर आझमची खेळी टिकू शकली नाही. सॉल्टने 41 चेंडूत नाबाद 88 धावा केल्याने इंग्लंडने केवळ 14.3 षटकात 2 बाद 170 धावा करून आरामात विजय मिळवला. तत्पूर्वी, बाबरच्या (babar azam) 59 चेंडूत नाबाद 87 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 6 बाद 169 धावा केल्या होत्या. (Shaun Tait Pakistan vs England)

सामना वाईट पद्धतीने गमावल्यानंतर पत्रकार परिषदेची पाळी आली तेव्हा पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट (Pakistan bowling coach Shaun Tait) यांनी आपल्याच संघ व्यवस्थापनाची खिल्ली उडवली. टेटचे विचित्र विधान ऐकून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) मॉडरेटरला हस्तक्षेप करावा लागला आणि टेट (Shaun Tait) यांना समजावून सांगण्यात आले.

पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट पत्रकार परिषदेसाठी पोहोचले होते. मात्र ते फारसे आनंदी दिसले नाहीत. संघाच्या कामगिरीसोबतच त्यांना पत्रकार परिषदेसाठी पाठवण्यात आल्याच्या निर्णयानेही ते नाराज होते. हारिस रौफच्या अनुपस्थितीत पाकिस्तानची गोलंदाजी शुक्रवारी कमकुवत दिसली. सामना हरला तर गोलंदाजी प्रशिक्षकावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार होते. त्याचवेळी, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी टेट म्हणाले की, "जेव्हा आम्ही वाईटरित्या हरतो... जेव्हा आमचा दणदणीत पराभव होतो तेव्हा ते मला पाठवतात."

गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट असे विधान केल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) नियंत्रकाने टेटसमोर ठेवलेला मायक्रोफोन बंद केला आणि त्याला विचारले की तो ठीक आहे का? त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी टेटना सांगितले.

दरम्यान, पाकिस्तान संघाचा स्टार गोलंदाज हारिस रौफ सहाव्या सामन्यात खेळला नाही.  पत्रकार परिषदेत कमकुवत गोलंदाजीबाबत प्रश्न विचारला असता, टेट यांनी आपल्या गोलंदाजांचा बचावही केला. डेथ ओव्हर्समध्ये कमकुवत गोलंदाजीवर प्रश्न विचारला असता शॉन टेटही आक्रमक दिसले.