पंत ठरला ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारा पहिला आशियाई विकेटकीपर

पंतच्या नावे नवा रेकॉर्ड

Updated: Jan 4, 2019, 11:25 AM IST
पंत ठरला ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारा पहिला आशियाई विकेटकीपर title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध शुक्रवारी शतक ठोकत ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टेस्टमध्ये शतक ठोकणारा पहिला आशियाचा विकेटकीपर ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा खेळाडू कुमार संगकाराने ऑस्ट्रेलियामध्ये २००७ मध्ये टेस्टमध्ये शतक ठोकलं होतं. पण त्या सामन्यात तो विकेटकीपर नव्हता. याआधी ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक रन करणारा विकेटकीपरचा रेकॉर्ड भारतीय खेळाडू फारुख इंजीनियरच्या नावे होता. त्याने त्या इनिंगमध्ये ८९ रन केले होते.

ऋषभ पंतने १५० व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर फोर मारत टेस्ट करिअरमधील दुसरं शतक ठोकलं. ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे. पंतने १३७ बॉलमध्ये ८ फोरच्या मदतीने हा शतक पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशीच्या खेळ सुरु झाल्यानंतर टीम इंडियाला हनुमा विहारीच्या रुपात पहिला झटका लागला. तो ४२ रनवर आऊट झाला.  यानंतर पुजाराने ऋषभ पंतच्या मदतीने सहाव्या विकेटसाठी ८९ रनची पार्टनरशिप केल आणि टीम इंडियाला ४०० रनपर्यंत पोहोचवलं. पुजारा दुहेरी शतक जवळ असताना आऊट झाला