निवृत्तीच्या आधी सुनील छेत्रीने किंग कोहलीला केला होता मेसेज, विराटने सांगितली 'अंतर की बात'

Virat Kohli On Sunil Chhetri : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर खुलासा केलाय. त्याने मला मेसेज केला होता, असं विराट म्हणाला.

सौरभ तळेकर | Updated: May 17, 2024, 04:56 PM IST
निवृत्तीच्या आधी सुनील छेत्रीने किंग कोहलीला केला होता मेसेज, विराटने सांगितली 'अंतर की बात' title=
Sunil Chhetri Virat Kohli

Sunil Chhetri Had Messaged Virat Kohli : भारतीय फुटबॉलचा बादशाह म्हणून सुनील छेत्रीचं नाव घेतलं जातं. सुनील छेत्रीने काल निवृत्तीची घोषणा केली. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देईल. सुनील छेत्रीचं करियर खुप यशस्वी आणि मोठं राहिलं आहे. त्याने भारतासाठी तब्बल 150 सामने खेळले असून त्याने 94 गोल केले आहेत. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सुनील छेत्री तिसऱ्या स्थानी आहे. सुनील छेत्रीने निवृत्ती घेतल्यानंतर आता भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीये. मात्र, तुम्हाला माहितीये का? सुनील छेत्री याने निवृत्ती घेण्याची माहिती विराट कोहलीला आधीच दिली होती.

विराट कोहलीने आरसीबीच्या इनसाईडरमध्ये सुनील छेत्रीच्या विनम्र स्वभावाचं कौतूक केलं. निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता सुनील छेत्री समाधानी असेल, असं विराटने म्हटलं आहे. सुनील छेत्री एक महान खेळाडू आहे. त्याने मला मेसेज करून सांगितलं होतं की तो निवृत्ती घेतोय. मला वाटतंय की त्याच्या या निर्णयामुळे त्याला नक्कीच समाधान मिळालं असेल. गेल्या काही वर्षांपासून आम्ही खूप जवळ आलोय. मी त्याला शुभेच्छा देतो, तो खूप चांगला माणूस आहे, असं म्हणत विराटने सुनील छेत्रीचं कौतूक केलंय.

विराट कोहली क्रिकेट जरी खेळत असला तरी तो फुटबॉलचा चाहता आहे. विराट कोहली आणि सुनील छेत्रीचे संबंध देखील चांगले आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबईच्या सामन्यात दोन्ही दिग्गजांची भेट झाली होती. त्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याआधी कोव्हिड काळात या दोघांची घट्ट मैत्री झाली होती.  दोघांच्या लाईव्हचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात.

दरम्यान, आरसीबीच्या इनसाईडरमध्ये बोलताना विराटने वामिकावर देखील भाष्य केलं. वामिका आता बॅटिंग करायला लागलीये, असंही विराटने यावेळी सांगितलं. मुलांवर कधीही क्रिकेट खेळण्याचं प्रेशर येऊ देणार नाही. माझ्या मुलीला बॅट पकडायला आणि फिरवायला मजा येतीये. पण तिला काय व्हायचंय यावर नक्कीच तिझाच निर्णय असेल, असं विराटने यावेळी म्हटलं आहे.