POINTS TABLE: पहिल्या 2 सामन्यानंतरच सुपर-4 चं चित्र स्पष्ट, पहा पॉईंट्स टेबलची स्थिती कशी आहे?

Team India : उद्या सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) रंगणार आहे. मात्र या स्पर्धेचे 2 सामने झाले असून आताच सुपर-4 चं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.  

सुरभि जगदीश | Updated: Sep 1, 2023, 04:25 PM IST
POINTS TABLE: पहिल्या 2 सामन्यानंतरच सुपर-4 चं चित्र स्पष्ट, पहा पॉईंट्स टेबलची स्थिती कशी आहे? title=

Team India : एशिया कपला 2023 ( Asia Cup 2023 ) ला सुरुवात झाली असून आतापर्यंत 2 सामने झाले आहेत. यावेळी पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ( Pakistan ) तर दुसऱ्या सामन्या श्रीलंकेचा विजय झाला. तर उद्या सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) रंगणार आहे. मात्र या स्पर्धेचे 2 सामने झाले असून आताच सुपर-4 चं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.  

एशिया कप 2023 साठी सर्व टीम 2 ग्रुप्समध्ये विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये ग्रुप A मध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि भारत यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजेच ग्रुप B मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुप्समधून 3 टीम्सना प्रत्येकी 2-2 सामने खेळायचे आहे. अशातच अशिया कप 2023 चं पॉईंट्स टेबल कसं आहे. 

ग्रुप A मधून टीम इंडिया आणि पाकिस्तान होणार क्वालिफाय

आशिया कप 2023 ( ( Asia Cup 2023 ) ) मध्ये एकूण 6 टीम सहभागी होत आहेत. ए गटात पाकिस्तान आणि नेपाळचे पहिले सामने झाले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने नेपाळचा पराभव केला आहे. आता 2 सप्टेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. यानंतर टीम इंडियाचा नेपाळशी सामना 4 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडियासाठी हा अतिशय सोपा सामना असणार आहे. पाकिस्तानने यापूर्वीच नेपाळला पराभूत केलंय. अशा परिस्थितीत अ गटातील टीम इंडिया ( Team India ) आणि पाकिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरतील.

ग्रुप B श्रीलंका आणि अफगाणिस्तान पोहोचणार सुपर 4 मध्ये

आशिया कप 2023 मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे टीम बी गटात आहेत. श्रीलंका आणि बांगलादेशचा पहिला गट सामना झाला ज्यात श्रीलंकेने विजय मिळवला. बी गटातील दुसरा सामना 3 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. या ग्रुपमध्ये तिसरा सामना 5 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. सुपर 4 मध्ये श्रीलंकेचा प्रवेश जवळपास निश्चित झालाय. आता 3 सप्टेंबरला अफगाणिस्तानलाही संधी आहे, जर अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध जिंकला तर बांगलादेशचा पराभव होईल.

त्यामुळे एकंदरीत आशिया कपमध्ये 2 सामने झाले असून सुपर 4 चं संपूर्ण चित्र क्लियर होताना दिसतंय. त्यामुळे आता आशिया कपच्या फायनलमध्ये कोणत्या टीम बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.