"तुमचे शब्द म्हणजे...", पृथ्वी शॉचं बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या ट्वीटला उत्तर

Prithvi Shaw Gave Reply On Jay Shah Tweet: भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. देशात क्रिकेटपटूंची संख्या आणि संघातील 11 खेळाडूंची निवड करणं कठीण प्रक्रिया असते. अनेकदा चांगली कामगिरी करूनही संघात निवड होत नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंच्या पदरी निराशा पडते. सध्या पृथ्वी शॉच्या बाबतीतही असंच काहीसं म्हणावं लागेल.

Updated: Jan 12, 2023, 02:07 PM IST
"तुमचे शब्द म्हणजे...", पृथ्वी शॉचं बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या ट्वीटला उत्तर title=

Prithvi Shaw Gave Reply On Jay Shah Tweet: भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. देशात क्रिकेटपटूंची संख्या आणि संघातील 11 खेळाडूंची निवड करणं कठीण प्रक्रिया असते. अनेकदा चांगली कामगिरी करूनही संघात निवड होत नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंच्या पदरी निराशा पडते. सध्या पृथ्वी शॉच्या बाबतीतही असंच काहीसं म्हणावं लागेल. बीसीसीआयच्या निवड समितीने बांगलादेश विरुध्दच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याची निवड केली नव्हती. त्यानंतर आता सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही डावललं आहे. भारतीय संघात निवड न झाल्याने नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. आता पृथ्वी शॉ रणजी चषकात आपल्या फलंदाजीनं क्रीडा रसिकांची मनं जिंकत आहे. पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावांची खेळी केली. आसामविरुद्धची ही खेळी मुंबईला तारणारी ठरली. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी पृथ्वी शॉ मेहनत करत आहे. टीम इंडियाकडून शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. 

पृथ्वीची रणजी चषकातील कामगिरी पाहून बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीट केलं होतं. त्यांनी ट्वीट करत लिहिलं होतं की, "आणखी एक विक्रमाची नोंद! जबरदस्त खेळी पृथ्वी शॉ.. रणजी चषक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्याबद्दल अभिनंदन. तुझ्यात अफाट क्षमता आहे. तुझा अभिमान वाटतो." जय शाह यांनी केलेल्या ट्वीटला पृथ्वी शॉ याने उत्तर दिलं आहे. त्याने लिहिलं की, "जय शाह सर, तुमचे खूप खूप आभार. तुमचे शब्द म्हणजे प्रोत्साहन, यामुळे मी आणखी जोमाने मेहनत करीन."

बातमी वाचा- Prithvi Shaw : "ती पोस्ट फक्त..."; साई बाबांचा फोटो Insta स्टोरीला ठेवण्यासंदर्भात पृथ्वी शॉनं दिलं स्पष्टीकरण

पृथ्वी शॉची रणजी चषकातील ही दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या बीबी निंबाळकर यांनी 443 धावांची खेळी सौराष्ट्र विरुद्ध 1948 साली केली होती. तर मुंबईकडून खेळताना पृथ्वीने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याचा विक्रम मोडीत काढला. मांजरेकरनं 1991 मध्ये हैदराबादविरुद्ध 377 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर पृथ्वी शॉ हा एकमेक खेळाडू आहे की, त्याने विजय हजारे चषक स्पर्धेत दुहेरी शतक, सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत शतक आणि आता रणजी चषकात तिहेरी शतक झळकावलं आहे.