Sarfaraz Khan: 'तो आला, लढला पण हुकला...', मुंबईकर सरफराज खानचा गेम झाला

Sarfaraz Khan Debut: दरम्यान जडेजा 99 रन्सवर खेळ असताना सरफराजला रन आऊट होऊन माघारी परतावं लागलं. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 15, 2024, 06:09 PM IST
Sarfaraz Khan: 'तो आला, लढला पण हुकला...', मुंबईकर सरफराज खानचा गेम झाला  title=

Sarfaraz Khan Debut: राजकोट टेस्टच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईकर सरफराज खानने ( Sarfaraz Khan ) डेब्यू केला. मात्र पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सरफराज खानचा गेम झाल्याचं चित्र चाहत्यांना दिसून आलं. डेब्यू सामन्यात सरफराज खानने ( Sarfaraz Khan ) 48 सामन्यात अर्धशतक झळकावलं. तो शतकाकडे वाटचाल करत असतानात रविंद्र जडेजाच्या एका चुकीमुळे सरफराज खानला माघारी परतावं लागलं आहे.

पहिल्याचं सामन्यात सरफराज रन-आऊट

मैदानावर उतरताच सरफराज खानने ( Sarfaraz Khan ) त्याची जादू दाखवून दिली. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात फलंदाजीला आलेल्या सरफराजने शानदार प्रदर्शन केलं. त्याच्या बॅटमधून पहिला रन निघताच स्टँडवर उपस्थित असलेले वडील आणि त्यांची पत्नी आनंदित झाले होते. दरम्यान जडेजा 99 रन्सवर खेळ असताना सरफराजला रन आऊट होऊन माघारी परतावं लागलं. 

जडेजाने रनचा कॉल नाकारला आणि...

सरफारज खान ( Sarfaraz Khan ) 62 रन्सवर नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. 99 रन्सवर खेळत असलेला जडेजाने सेंच्युरी पूर्ण होण्यासाठी एका रनचा कॉल दिला. समोरून सरफराज खान ( Sarfaraz Khan ) धावला. मात्र, जडेजाने कॉल नाकारला आणि सरफराज खान आऊट झाला. यावेळी स्टँडमध्ये बसलेलं त्याचं कुटुंब फार नाराज झालं. याशिवाय जडेजाच्या चेहऱ्यावरून देखील त्याला प्रचंड वाईट वाटलं असल्याचं दिसून आलं.

सरफराज खानचा अखेर डेब्यू

आज सरफराज खानचं ( Sarfaraz Khan ) स्वप्न पूर्ण झालं आणि त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सरफराज खानला पहिला आंतरराष्ट्रीय रन काढण्यासाठी 6 बॉल्स लागले. यावेळी पहिले 5 बॉल डॉट होते, तर सहाव्या बॉलवर त्याने 3 रन्स घेत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला रन घेतला. हा क्षण पाहून स्टँडवर उपस्थित असलेले त्याचे वडील आणि पत्नी आनंदी दिसत होते. यावेळी दोघांनीही उभं राहून उत्साहाने टाळ्या वाजवल्या.

टीम इंडियाची प्लेईंग 11

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.