भारत वि ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे अक्षऱ पटेल बाहेर, जडेजाला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाहीये. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलीये.

Updated: Sep 17, 2017, 08:38 AM IST
भारत वि ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे अक्षऱ पटेल बाहेर, जडेजाला संधी title=

चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाहीये. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलीये.

शनिवारी सरावादरम्यान अक्षर पटेलला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या जागी पहिल्या तीन वनडेत जडेजा खेळणार आहे. अक्षरला फुटबॉल खेळताना दुखापत झाली आणि बीसीसीआयने त्याला आरामाचा सल्ला दिलाय.

बीसीसीआयच्या माहितीनुसार, एमए चिदंबरम स्टेडियमवर सरावादरम्यान अक्षऱच्या उजव्या टाचेला दुखापत झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांसाठी पटेलऐवजी जडेजाची निवड केली जात आहे. अक्षरला आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय.